Pune News : पुण्यात भरधाव कारने 12 जणांना उडवले, MPSC चे विद्यार्थी जखमी

Pune News : पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका वेगवान कारने 12 जणांना उडवले आहे. या अपघातामध्ये MPSC चे विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Car Accident : या अपघातामध्ये MPSC चे विद्यार्थी जखमी झाले आहेत.
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका वेगवान कारने 12 जणांना उडवले आहे. या अपघातामध्ये MPSC चे विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवतहानी झालेली नाही. पण काही जणांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो मद्यप्राशन करुन कार चालवत होता. भावे हायस्कूल जवळ काही विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहा पीत असताना हा अपघात घडला.  जयराम शिवाजी असं या कॅबचालकाचं नाव आहे. हुंडाई टुरिस्टच्या कारनं हा अपघात झाला आहे. 

भरधाव वेगाने येणाऱ्या ह्युंदाई ऑरा कारने थेट चहाच्या टपरीवर धडक दिली, ज्यामध्ये 12 जण जखमी झाले, यामध्ये 5 एमपीएससी विद्यार्थी आहेत

चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असताना नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी विद्यार्थी चहा पिण्यासाठी त्या टपरीवर जमले होते.

Advertisement

( नक्की वाचा :  Operation Sindoor नंतर वादग्रस्त व्हिडिओ, पुण्याच्या मुलीला बंगाल पोलिसांकडून अटक! AIMIM नेत्यावर आरोप )

पोलीस सूत्रांनुसार, जखमींपैकी एक मुलगी आणि आणखी चार जणांचे पायांना दुखापत झाली आहे. सर्व जखमींना तात्काळ संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. निरीक्षक पवार यांनी सांगितले चालक नशेत होता. भावे हायस्कूलजवळ रस्त्यावर असलेल्या वाहनांना आणि काही लोकांना धडक देत त्याने कार थेट चहाच्या टपरीवर नेली.

Advertisement

दुर्घटनाग्रस्त चालकाला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीचं आश्वासन

दरम्यान, या अपघातामध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं त्याबाबत स्थानिक आमदार हेमंक रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचं तसंच त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. 
 

Topics mentioned in this article