Pune News: पुण्यात उद्या 'या' भागातील शाळा-कॉलेज बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर

Pune News: मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या सोयीकरिता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेले हे निर्देश रहिवासी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची संधी मिळण्यासाठी आहेत.

विविध जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ज्यामुळे सरकारी कार्यालये, निमशासकीय बंद राहतील. निवडणुकीच्या दिवशीच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

(नक्की वाचा- Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदारसंघात सुट्टी असणार आहे.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article