Pune News: दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या रागातून प्रेयसीवर चाकूने वार; 10 दिवस मृत्यूशी झुंझ अपयशी, आरोपी अटकेत

Pune Crime News: पुण्यातील चंदननगर भागात लग्नाचे ठरल्याच्या रागातून प्रियकराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे, पुणे

पुण्यातील चंदननगर परिसरात एकातर्फे प्रेमातून आणि रागातून घडलेल्या धक्कादायक घटनेत 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रियकराने घरात घुसून केलेल्या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या तरुणीची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मयत तरुणी उजालादेवी दोहरे आणि आरोपी दिलीप राठोड हे दोघे पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकत्र काम करत होते. कामाच्या ठिकाणीच त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, काही काळापूर्वी तरुणी तिच्या मूळ गावी गेली असता, तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरवले होते.

Advertisement

(नक्की वाचा-  Pandharpur-Tirupati Train: विठूरायाची पंढरी तिरुपतीशी जोडली! 16 मेपासून नियमित रेल्वे धावणार, वाचा टाईमटेबल)

लग्नाचे सांगताच प्रियकर संतापला

"माझे लग्न ठरले आहे," ही माहिती तरुणीने दिलीपला दिली. मात्र, हे लग्न मान्य नसलेल्या दिलीपला याचा प्रचंड राग आला. याच रागातून 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दिलीप तरुणीच्या चंदननगर येथील घरात घुसला. तिथे त्याने तिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

(नक्की वाचा-  IPL 2026: हार्दिक पांड्या MI च्या ताफ्यातून गायब! RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईची धाकधूक वाढली)

उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी अटकेत

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती, मात्र अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली. घटनेनंतर चंदननगर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी दिलीप राठोड याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर आता आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

Topics mentioned in this article