कोणाला कोणत्या कारणावरून राग येईल याचा नेम नाही. त्यातून गंभीर गुन्हे ही घडत आहेत. पुण्यात तर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांवर अत्याचार, लहान मुलींचे लैंगिक शोषण, कोयता गँग,खून, आत्महत्या, या सारखे गुन्हे पुण्यात अलीकडच्या काळाच घडले आहेत. नुकतेच शालेय विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खूनासाठी सुपारी दिल्याची बातमी ताजीच आहेत. त्यात आता आणखी एक बातमीचा भर पडला आहे. ही घटना घडली आहे ती पुण्याच्या हिंजवडी परिसरात. या घटनेनंतर सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील हिंजवडी परिसरात मारुंजी हा भाग आहे. इथं एक उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीमध्येच हा भयंकर प्रकार समोर आला आहे. इथं राम गंभीरे हा राहातो. तो या सोसायटीत येत असताना त्याच्या हातातील एक वस्तू खाली पडली. ती वस्तू एकाने उचलून दिली. त्यावरू वाद झाला. हा वाद टोकाला गेला. त्यानंतर राम आणि त्याच्या दोन साथिदारांनी वस्तू उचलून देणाऱ्या तरूणाला मारहाण करण्यास सुरूवात केली. हा तरूण 20 वर्षाचा होता.
ट्रेंडिंग बातमी - Big news: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, दिलं 'हे' कारण
त्याला मारहाण करून राम आणि त्याच्या साथिदारांचे भागले नाही. त्यांनी त्या तरूणाच्या प्रायव्हेट पार्टला बाम लावला. त्यानंतर तो वेदनेनं कळवळत होता. त्याच वेळी त्याचा व्हिडीओ ही काढला गेला. कहरमध्ये प्रायव्हेट पार्टला बाम लावतानाचा हा व्हिडीओ या लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल ही केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. हा प्रकार ज्या सोसायटीत घडला ती उच्चभ्रू आणि प्रतिष्ठीत लोकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते.
किरकोळ वाद इतका टोकाला जावू शकतो हे यावरून दिसून आले. त्यानंतर पिडीत तरूणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी झालेली हकीगत पोलिसांना सांगितली. तरुणाच्या तक्रारी वरून श्रेयस संजय कवडे, ललित प्रमोद भदाने, राम तुळशीराम गंभिरे या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा ही नोंदवला आहे. याबाबत अधिक तपास करत असल्याचे पोलिस उपआयुक्त विशाल गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र अशा घटनांमुळे पुण्याची प्रतिमा मलिन होत असल्याची प्रतिक्रीया येत आहेत.