प्रतीक्षा पारखी, पुणे
काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या (NSUI) अध्यक्षाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. अक्षय कांबळे असं या आरोपीचं नाव आहे. अक्षय कांबळेविरोधात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घटना समोर आल्यानंतर पुणे एनएसयूआयचा विद्यापीठ अध्यक्ष अक्षय कांबळेची काँग्रेसमधून हकलपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी अर्जुन चपराना यांनी हकलपट्टीचं पत्र काढलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या राजकीय ताकदीचा गैरवापर करुन पुणे विद्यापीठ एनएसयूआय अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना मेसेज करुन त्रास दिला आहे. त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या मेसेजमुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.
(नक्की वाचा - चहा पिण्याची तलफ अन् लाखोंचा गंडा; तात्यासाहेबांचं 'ते' स्वप्नही भंगलं! )
यानंतर संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलीस प्रशासनाने विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अक्षय कांबळेविरोधात विनयभंग आणि विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनानेही कारवाई करावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे सचिवांना देण्यात आले आहे.