रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune dargah controversy: पुण्यातील मुकंदनगर भागातील अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी लक्ष्मी नारायण चौकात शनिवारी (2 ऑगस्ट 2025) रोजी जोरदार आंदोलन केलं. तसंच हा दर्गा हटवण्यासाठी प्रशासनाला नवा अल्टीमेटमही दिला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील मुकुंदनगर येथील अनधिकृत हजरत दम दम शाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावाने झालेले फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं सातत्यानं होत आहे. या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भाजपा आमदार योगेश टिळेकर या आंदोलनात सहभागी झाले होते.
( नक्की वाचा : Malegaon Blast Case: 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक खुलासा )
सुरुवातीला दर्ग्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, पोलिसांनी त्यांना घटनास्थळी सोडलं नाही. त्यामुळे त्यांनी लक्ष्मी नारायण चौकात आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हा दर्गा 15 दिवसांच्या आत हटवला नाही तर इथं मारुतीचं मंदीर बांधण्यात येईल असा इशारा आमदार टिळेकर यांनी माध्यमांशी दिला. दरम्यान पोलिसांनी हे आंदोलन थांबवण्यासाठी आंदोलकांची जोरदार धरपकड केली. दर्गाच्या सभोवतालचे सर्व रस्ते बॅरिकेट टाकून बंद करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांच्या सात व्हॅन तैनात होत्या. सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन सुरु असताना काही मुस्लीम आणि दलित संघटनांनी दर्ग्याच्या बाजूनंही आंदोलन केलं.