Eye Health : डोळ्यात अंजन घालणारा सर्व्हेक्षण; पुण्यातील IT क्षेत्रातील 46 टक्के तरुणांचे डोळे धोक्यात

कम्प्युटरच्या स्क्रीनवर अधिक वेळ काम केल्याने डोळ्यांना वेगवेगळे त्रास होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

डोळे हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. त्याची योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं. डोळ्यांच्याच माध्यमातून आपण जग पाहू शकतो. मात्र बऱ्याचदा आपण डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतो. मात्र भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यातही तरुणांना याचा मोठा फटका बसत असल्याचीही माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सतत कम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहिल्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या 46 टक्के तरुणांमध्ये डोळ्याचे विकार वाढत असल्याचे निदर्शनात आले आहे.  पुण्यातील एनआयओ रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे.

नक्की वाचा - How To Remove Earwax: कानातील मळ काढण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय, चुंबकाप्रमाणे बाहेर येईल घाण

एन आय ओ यांना गेल्या सहा महिन्यांत 3 हजार रुग्णांच्या सर्वेक्षणातून ही गोष्ट निदर्शनास आली आहे. कम्प्युटरच्या स्क्रीनवर अधिक वेळ काम केल्याने डोळ्यांना वेगवेगळे त्रास होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात प्रामुख्याने 25 ते 56 वयोगटातील 46 टक्के आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना डोळे कोरडे होण्याचा त्रास होता. ज्याला आपण CVS अर्थात कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असे म्हणतो.

Advertisement

सर्वेक्षणानुसार 89 टक्के रुग्णांना डोळ्यांच्या ड्रॉपची आवश्यकता होती. त्यांना 20 - 20 - 20 या नियमांची शिफारस करण्यात आली आहे. म्हणजेच त्यांनी प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घेऊन 20 फूट लांब काहीतरी पाहणे आणि पुन्हा स्क्रीन कडे पाहणे. आपल्या डोळ्यांच्या काळजी खातर मोबाइल, टीव्ही, कम्प्युटर, टॅबलेटकडे कमी प्रमाणात पाहण्याचे आवाहन ही डॉक्टरांनी केले आहे.

Topics mentioned in this article