
How To Remove Earwax: वेळोवेळी शरीराच्या अन्य अवयवांप्रमाणे कान देखील स्वच्छ करणे आवश्यक आहे. कानामध्ये जमा होणारा मळ कानांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक असतो. यामुळे कानामध्ये चिकटपणा टिकून राहतो; परिणामी धूळ, घाण इत्यादी हानिकारक गोष्टी कानांच्या आतील भागापर्यंत पोहोचत नाही. पण आवश्यकतेपेक्षा कानामध्ये अधिक मळ जमा झाल्यास आणि त्यावरील धूळ-घाणीमुळे कानदुखी, कमी ऐकू येणे, कानामध्ये खाज येणे, कानातून दुर्गंध येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नुकतेच डॉक्टर विनोद शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर कान स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कानातील मळ काढण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी
कानामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक मळ जमा झाल्याने समस्या होत असल्यास कान स्वच्छ करण्यासाठी इअरबर्ड किंवा काडेपेटीच्या काडीचा वापर करू नये, याऐवजी डॉक्टरांची मदत घ्यावी. डॉक्टरांकडे कानातील मळ बाहेर काढण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध असतात.
ड्रॉपची मदत
कानांमध्ये मळ जमा झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ड्रॉपची मदत घ्यावी. ड्रॉपच्या मदतीने कानातील मळ सहजरित्या बाहेर येईल.
(नक्की वाचा: How To Drink Water: पाणी ग्लासऐवजी लोट्याने का प्यावे? पोट-आतड्यांवर काय होतील परिणाम, जाणून घ्या)
पाण्याने कान स्वच्छ करावे
कान स्वच्छ करण्यासाठी सीरिंज पद्धत देखील वापरली जाऊ शकते. यासाठी सीरिंजमध्ये थोडेसे कोमट पाणी घेऊन थोड्या प्रेशरने कानामध्ये सोडावे. यामुळे पाण्यासोबत कानातील घाणही बाहेर येईल. महत्त्वाचे म्हणजे ही पद्धत कायम तज्ज्ञांच्या देखरेखी अंतर्गत करावी. याशिवाय व्हॅक्युमच्या मदतीनेही कानातील मळ स्वच्छ करू शकता.
(नक्की वाचा: Belly Fat Loss Diet: सुटलेले पोट होईल सपाट, नियमित केवळ या इवल्याशा दोन गोष्टींचे करा सेवन)
कान स्वच्छ करण्यासाठी कधीही या गोष्टींचा वापर करू नये
डॉक्टरांच्या माहितीनुसार, कानामध्ये कधीही तूप, तेलाचे थेंब सोडू नये. यामुळे कानामध्ये बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतात. याव्यतिरिक्त कानामध्ये पाणी, इअर कँडलचाही वापर करू नये. कान स्वच्छ करण्यासाठी इअर बर्ड, हेअर क्लिप, काडीपेटीच्या काडीचा वापर करू नये. यामुळे कानातील मळ आणखी आतील भागामध्ये जाण्याचा धोका असतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world