जाहिरात

Pune News: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात बोगस इंटिग्रेटेड कॉलेजचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका

शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात बेकायदेशीर इंटिग्रेटेड कॉलेज आणि स्टडी सेंटर सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune News: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात बोगस इंटिग्रेटेड कॉलेजचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका
Pune Fake Integrated College News
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Fake Integrated College : शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात बेकायदेशीर इंटिग्रेटेड कॉलेज आणि स्टडी सेंटर सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वारगेट परिसरातील एज्युकेशन करिअर फाउंडेशन अर्थात ईसीएफ स्टडी सेंटरमध्ये बोगस इंटिग्रेटेड कॉलेज सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारीही चौकशीसाठी दाखल झाले होते.

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर इंटिग्रेटेड कॉलेज आणि स्टडी सेंटर सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. स्वारगेट येथील एज्युकेशन करिअर फाउंडेशन (ईसीएफ) स्टडी सेंटरमध्ये सुरू असलेल्या कथित बोगस इंटिग्रेटेड कॉलेजविरोधात मनविसेने आंदोलन छेडले.

दोन-तीन हजार विद्यार्थ्यांना शिकवणारे अनधिकृत क्लासेस 

मनविसेचे शहरप्रमुख धनंजय दळवी यांनी पुण्यात तब्बल 52 बेकायदेशीर इंटिग्रेटेड कॉलेज सुरू असल्याचा दावा केला. तसेच शहरातील विविध भागांत दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांना शिकवणारे अनधिकृत क्लासेस सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे,असा आरोपही त्यांनी केला.मनविसेकडून काही संस्थांची नावेही समोर आणण्यात आली आहेत.

नक्की वाचा >> Does Smartphone Cause Brain Tumor : स्मार्टफोनमुळे ब्रेन ट्यूमर होतो का? काय आहे यामागचं सत्य आणि गैरसमज?

तीव्र आंदोलन छेडण्याचा मनविसेचा इशारा

त्यामध्ये बाणेर येथील नमो आरआयएम कॉलेज,मगरपट्टा सिटी,हडपसर येथील विश्वा कॉलेज तसेच वानवडी येथील एस.बी.गिरमे ज्युनिअर कॉलेज यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला.आंदोलनाची दखल घेत उपशिक्षणाधिकारी किशोर चंदेल आणि सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पद्मा दिंडे यांनी संबंधित स्टडी सेंटरमध्ये जाऊन चौकशी केली.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनीही घटनास्थळी भेट दिली.मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून संस्था चालकांवर कारवाईची मागणी केली.तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी केवळ शासनमान्य आणि अधिकृत महाविद्यालयांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनविसेकडून देण्यात आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com