जाहिरात
This Article is From Jun 26, 2024

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या अवैध बांधकामावर हातोडा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आदेश दिल्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे. 

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या अवैध बांधकामावर हातोडा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर
पुणे:

पुण्यात प्रसिध्द वैशाली हॅाटेलवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत पाच हजार स्क्वेअर फूट बांधकाम तोडण्यात आलं आहे. मंगळवारी दिवसभरात महानगरपालिकेने 26 हॉटेल्सवर कारवाई केली असून यात वैशाली हॉटेलमधील अवैध बांधकाम तोडण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आदेश दिल्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे. 

वैशाली हॉटेलचे 37 हजार चौरस फुटांचं बांधकाम पाडण्यात आले आहे. यापुढेही पालिकेची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात एल3 या बारमध्ये ड्रग सेवन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काल आदेश दिले होते. त्यानुसार मुंबईतील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे.

आतापर्यंत पुण्यातील १४४ हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वैशाली हॉटेलचाही समावेश आहे. वैशालीतील अवैध बांधकामावर हातोडा चालविण्यात आला आहे. 

बातमी अपडेट होत आहे.