Pune News : पुणे जिल्ह्यात खळबळ! जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा मृत्यू, अपघात की घातपात?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Deputy Tehsildar Ananta Gawari Death
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Junnar Accident News Today :  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर हायवा आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (52) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना अपघाती घटना होती की घातपात? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. 

नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल अधिकाऱ्यांची होंडा सिटी कार बनकरफाट्याकडून जुन्नरकडे जात होती. यादरम्यान पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवाची गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर आलेल्या या कारला समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कार फिरून उलट दिशेला गेली. या अपघातात निवडणूक नायब तहसीलदार अनंता गवारी गंभीर जखमी झाले होते.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: बागेश्वर बाबांविरोधात शिवप्रेमी भडकले, पुण्यात संतप्त आंदोलन, शिवरायांबाबत केलं होतं खळबळजनक विधान

महसूल कर्मचारी विजय खर्तोडे गंभीर जखमी

त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.तसेच महसूल कर्मचारी विजय खर्तोडे हे गंभीर जखमी असून तुषार कोरडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पत्रकारांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान,या अपघातामागे नेमके कारण काय,हा अपघात की घातपात? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

नक्की वाचा >> Sambhajinagar: संभाजीनगरच्या लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! परीक्षेला जाताना होत्याचं नव्हतं झालं