अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेश स्थापनेच्या दिवशी आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू राहणार आहे. यासोबतच सातव्या दिवशी ज्या मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणुका पार पडतील, त्या मार्गांलगतची दारूची दुकाने बंद ठेवण्याचेही आदेश प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश काढले असून, सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
एकूणच, गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सण शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.
( नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोची प्रतीक्षा संपली! 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन कोणतं? )
पुण्यात 'या' भागात जड वाहनांना वाहतूकीसाठी बंदी
पुणे शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या काळात या काळात पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे. शहरात फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्या बाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
कोणत्या मार्गावर बंदी?
या आदेशानुसार शास्त्री रोड - सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोड - जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोड - शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोड - संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड - फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोड - पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोड - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक या मार्गवार अवजड वाहनांना पूर्ण पणे बंदी असेल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.