- केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला पोलीसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे
- सियाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
- सियाच्या वडिल म्हटले की जर सियाने हत्या केली असेल तर तिला शिक्षा होणे आवश्यक आहे
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता नवनवी गोष्टी समोर येत आहेत. सिया गोयल हिला या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून पोलीसांनी अटक केली आहे. तिची सध्या चौकशी सुरू आहे. त्यात आता सियाच्या घरी तणावाचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणात मुलगी असल्याने सियाच्या वडीलांचे तब्बेत अचानक बिघडली होती. त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ते आयसीयुमध्ये होते. मात्र आता त्यांची तब्बेत स्थिर आहे. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला आहे. केतन यांची हत्या ही आपल्यासाठी मोठा धक्का असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यात जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहीजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
या प्रकरणात त्यांची मुलगी सिया ही मुख्य आरोपी आहे. तिनेच केतनची हत्या घडवून आणल्याचा तिच्यावर आरोप आहे. याबाबत ही सियाच्या वडीलांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ते म्हणाले जर सियाने हे केलं असेल तर त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहीजे. त्यासाठी तिला फाशी किंवा जन्मठेप नको. तर तिला ज्या ठिकाणाहून केतन यांना खाली ढकलण्यात आलं त्याच लोहगडाहून तिला खाली ढकलून द्यावं अशी मागणीच त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आपल्याला मोठा धक्का लागल्याचं ही ते म्हणाले.
याबाबत ते म्हणाले सिया एक साधी सरळ मुलगी होती. ती असं काही करेल असं वाटत नाही असं ही सियाचे वडील यावेळी म्हणाले. ती दारू प्यायची हा आरोप खोटं आहे. तसं असतं तर कुणाला समजलं त्यांनी आम्हाला सांगायला हवं होतं. तसं सांगितलं असतं तर आम्ही याबाबत तिला जाब विचारला असता. तिला ओरडो असतो. पण आम्हाला तसं कुणी सांगितलं नाही. चेतन चौधरी हा आम्हाला माहित नाही. त्याला मी कधी ही पाहीलं नाही. पहिल्यांदाच त्याचं नाव ऐकत आहे. तो घरी ही कधीच आला नाही. मुलीचं बाहेर अफेर होतं हा बाब सियाच्या वडीलांनी फेटाळली आहे.
सियाचे वडील केतनच्या कुटुंबीयांबाबतही भरभरू बोलले आहेत. ते म्हणाले आमचे केतनच्या घरातल्यांसोबत चांगले संबंध होते. त्यांच्या सारखं नात आम्हाला कधीच मिळालं नसतं. केतन खुप चांगला मुलगा होता. प्रत्येक गोष्टीत तो आम्हाला मदत करत होता. तो घरातल्या सर्वांची काळजी घ्यायचा. आम्ही त्याला मुलग्या प्रमाणे समजायचो. ते सर्व चांगले लोक आहेत. त्यांना ही सिया बाबत प्रेम होतं ते सियाचे नेहमी लाड करत होते. त्यामुळे ज्याने कुणी हे केलं आहे त्याला शिक्षा झाली पाहीजे. त्यात जर माझी मुलगी असेल तर तिला ही शिक्षा झाली पाहीजे असं ही सियाच्या वडीलांनी स्पष्ट केलं.
#WATCH | Pune, Maharashtra: Ketan Agarwal Murder Case | Pravin Goyal, father of accused Siya Goyal, says, "Whoever did this should receive the harshest punishment. Just like the fort from which our Ketan fell, whoever is found guilty, even if it's my own daughter, should be… pic.twitter.com/V4ljVOXQBP
— ANI (@ANI) June 25, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world