जाहिरात

Ketan Agarwal Murder: केतन अग्रवालच्या हत्येचा रश्मिकाच्या सिनेमाशी संबंध काय? सोशल मीडियावर पेटलाय नवा वाद

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.या प्रकरणाची वेगवेगळ्या बाजूनं सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Ketan Agarwal Murder: केतन अग्रवालच्या हत्येचा रश्मिकाच्या सिनेमाशी संबंध काय? सोशल मीडियावर पेटलाय नवा वाद
Ketan Agarwal Murder Case : केतनच्या हत्येनंतर रश्मिकाचा एक चित्रपट चर्चेत आलाय.
मुंबई:

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.या प्रकरणाची वेगवेगळ्या बाजूनं सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चेत  दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा 'द गर्लफ्रेंड' चित्रपट चांगलाच होरपळला आहे. एका खऱ्याखुऱ्या आणि क्रूर हत्याकांडाचा संबंध थेट या सिनेमाशी जोडला गेल्याने सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

चित्रपटांमध्ये नेहमी महिलांची बाजू घेऊन पुरुषांनाच खलनायक दाखवले जाते आणि प्रत्यक्षात घडणारे सिया गोयलसारखे भयानक गुन्हे लपवले जातात, असा गंभीर आरोप एका युझरने चित्रपटाचा फोटो शेअर करत केला. या ट्रोलिंगनंतर नेटकऱ्यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवींद्रन यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या वाढत्या गदारोळावर आता दिग्दर्शकाने समोर येत अत्यंत टोकदार आणि सडेतोड उत्तर दिले आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

काय म्हणाला दिग्दर्शक?

सोशल मीडियावरील या तीव्र टीकेला उत्तर देताना दिग्दर्शक राहुल रवींद्रन यांनी एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी या घटनेला पुरुषांवर महिलांनी केलेला अत्याचार म्हणून अजिबात पाहत नाही. ही एका विकृत मानसिकतेच्या माणसाने केलेली क्रूर हत्या आहे, जी व्यक्ती योगायोगाने एक महिला आहे. याउलट, मी वर्षानुवर्षे चालत आलेली अशी समाजव्यवस्था पाहत आहे, जिथे महिलांचा कोंडमारा होतो. 

दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून महिलांना स्वतःची ओळख लहान करण्यास भाग पाडले जाते. त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे जग मिळत नाही आणि माझ्या आजूबाजूला अशा अनेक महिला आहेत ज्या हे सर्व शांतपणे सहन करतात. एक पुरुष म्हणून मला या प्रस्थापित व्यवस्थेचा फायदा मिळतो, म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि महिलांची बाजू मांडण्यासाठी मी या चित्रपटाच्या कथेची निवड केली.

गुन्ह्यांचे उदात्तीकरण नाही

राहुल रवींद्रन यांनी पुढे स्पष्ट केले की, मी केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचे सविस्तर वाचन केलेले नाही. परंतु, जर मला या घटनेवर कधी चित्रपट बनवावासा वाटला, तर तो एका विशिष्ट महिलेने केलेल्या गुन्ह्याबद्दल असेल, संपूर्ण महिला वर्गाने पुरुषांवर केलेल्या अत्याचारांबद्दल नाही. दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. 

( नक्की वाचा : महाल बुकींग आणि प्रायव्हेट जेटची चर्चा विसरा, पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात सियाने टाकला नवा डाव )
 

'द गर्लफ्रेंड' या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत मुख्य भूमिकेत असलेला विक्रम हा कोणताही खुनी किंवा बलात्कारी दाखवलेला नाही, तो एक प्रामाणिक प्रियकर आहे. तरीही समाजातील एका घटकाला या चित्रपटाचा त्रास का होतोय, याचा त्यांनी स्वतः विचार करावा.कोणाला माझ्या विचारांवर आक्षेप असेल तर त्यांनी तो नक्की नोंदवावा, मी त्या फीडबॅकवर आत्मपरीक्षण करेन, असेही त्यांनी सांगितले.

काय आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरण?

दुसरीकडे, पुणे आणि लोणावळा परिसरात झालेल्या या खळबळजनक खटल्याचा तपास करताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल हिने केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. हे दोघे पहिल्यांदा 31 मे रोजी किल्ल्यावर गेले होते. त्यानंतर 4 जून रोजी सियाने पुन्हा तिथे जाण्याचा हट्ट केला, पण केतनच्या आईने परवानगी दिली नाही. 

( नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: सियाचे आई-वडील पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, केतनबाबत झाले हळवे तर लेकीबद्दल म्हणाले... )

अखेर 14 जून रोजी ती केतनला पुन्हा किल्ल्यावर घेऊन गेली आणि तिथे तिने त्याला कड्यावरून ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यावेळी केतनने एका झुडपाचा आधार घेतल्याने तो वाचला. तू मला का ढकलले असे विचारल्यावर, तिथे साप आला होता आणि तुला वाचवण्यासाठी मी धक्का दिला, अशी खोटी कथा सियाने रचली होती. अखेर 18 जून रोजी अत्यंत क्रूरपणे केतनला कड्यावरून ढकलून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com