Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?

Lohagad Fort News: पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारे खुलासे झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: पुण्याच्या केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून ढकलून केतनची हत्या केवळ लग्नाला नकार म्हणून करण्यात आली नव्हती.  यामागे कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि एका सुनियोजित कटाचा देखील भाग होता, हे पुणे पोलिसांनी उघड केले आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ हत्येचाच कट रचला नव्हता, तर गुन्हा पचवून भविष्यात एकत्र येण्यासाठी 'थ्री इयर प्लॅन' देखील तयार केला होता.

लग्नाच्या शॉपिंगच्या नावाखाली 1 कोटींची फसवणूक

पोलीस आणि फॉरेन्सिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिने लग्न ठरल्यापासून केतन अग्रवालकडे लग्नाच्या पूर्वतयारीसाठी आणि खरेदीसाठी पैशांची मागणी केली होती. केतनने तिच्यावर विश्वास ठेवून सुमारे 1 कोटी रुपयांची मोठी रक्कम सियाकडे सुपूर्द केली.

Advertisement

प्रियकराचा बिझनेस सेटल केला

सियाने हे 1 कोटी रुपये स्वतःच्या लग्नासाठी न वापरता, तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिले. चेतन चौधरी हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीचा होता. त्याने स्वतःचा व्यवसाय आणि करिअर स्थिर करण्यासाठी सियाकडे 3 वर्षांचा वेळ मागितला होता. त्यामुळे दोघांनी ठरवले होते की, केतनचा काटा काढल्यानंतर सिया संशय टाळण्यासाठी पुढील 3 वर्षे लग्न करणार नाही. एकदा का हे प्रकरण शांत झाले आणि चेतन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला की, घरच्यांच्या संमतीने ते लग्न करणार होते.

(नक्की वाचा-  मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला 'शिंग्रोबा' यांचे नाव द्या! मुख्यमंत्र्यांकडे थेट पत्राद्वारे)

काय होता मृत्यूचा सिग्नल?

18 जून रोजी घडलेल्या या थरारक हत्याकांडात सिया आणि चेतनने एकमेकांना संकेत देण्यासाठी एक कोड ठरवला होता. प्लॅननुसार, सियाने किल्ल्याच्या कड्यापाशी गेल्यावर 'खाली बसणे' हा मुख्य संकेत होता. पाणी पिण्याच्या बहाण्याने किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने तिने खाली बसायचे होते. सिया खाली बसताच मागे लपून बसलेल्या चेतनने पुढे येऊन गाफील असलेल्या केतनला दरीत ढकलून द्यायचे, असे ठरले होते. 

कारऐवजी स्कूटरचा वापर

चेतन चौधरी 18 जून रोजी पुणे ते लोहगड किल्ला हे तब्बल 9 किलोमीटरचे अंतर कारऐवजी स्कूटरने पार करून आला होता. टोल प्लाझा किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कारचा नंबर ट्रेस होऊ नये, म्हणून त्याने मुद्दाम दुचाकीचा वापर केला. पोलिसांनी ही स्कूटर जप्त केली आहे.