महाल बुकींग आणि प्रायव्हेट जेटची चर्चा विसरा, पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात सियाने टाकला नवा डाव

Pune Ketan Agarwal murder case: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात आता एक  नवा ट्विस्ट आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ketan Agarwal murder case: आरोपी सियानं बचावासाठी केतनवरच आरोप केले आहेत.
पुणे:

Pune Ketan Agarwal murder case: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात आता एक  नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने पोलिसांसमोर स्वतःचा बचाव करण्यासाठी एक नवा डाव टाकला असून, मृत केतननेच आपल्याला लग्न न केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती, असा दावा तिने केला आहे. लोणावळ्या जवळील लोहगड किल्ल्यावरून होणाऱ्या पतीला दरीत ढकलून देणाऱ्या सियाने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, तिची या लग्नाची अजिबात इच्छा नव्हती. तिने केतनला लग्न मोडण्याबाबत स्पष्ट सांगितले होते, मात्र केतन कोणत्याही परिस्थितीत हे लग्न रद्द करायला तयार नव्हता.

काय म्हणाली सिया?

सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा विवाह सोहळा प्रचंड थाटामाटात होणार होता.मात्र, पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. सियाचे चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि तिला केतनसोबत संसार थाटायचा नव्हता. सियाच्या दाव्यानुसार, जेव्हा तिने केतनकडे लग्न न करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा केतनने आपल्या कुटुंबाच्या श्रीमंतीचा आणि प्रभावाचा धाक दाखवला.

Advertisement

 तू या लग्नातून सुटू शकत नाहीस, अगदी पळून जाण्याचा प्रयत्न केलास तरी तुला सोडणार नाही, अशी धमकी केतनने दिल्याचे सियाचे म्हणणे आहे. अर्थात, सियाने केलेल्या या दाव्यांची पोलीस आणि न्यायालयीन पातळीवर सध्या कसून चौकशी केली जात आहे.

( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )

थंड डोक्यानं रचला कट

केतनला संपवण्यासाठी सिया आणि तिचा प्रेमी चेतन यांनी प्रचंड थंड डोक्याने कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे, 14 जून रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला होता. मात्र, केतनने कड्यावरील एका झुडपाचा आधार घेतल्याने तो थोडक्यात वाचला. त्यावेळी आपला कट उघड होऊ नये म्हणून सियाने तिथे साप निघाल्याचे नाटक केले आणि घाबरून केतनला मिठी मारली. 

या पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतर तिने पुन्हा एकदा केतनला लोहगडवर येण्यासाठी तयार केले, पण यावेळी तिने तिचा प्रेमी चेतन यालाही सोबत बोलावले. या दोघांनी मिळून केतनला पाठीमागून दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. जर हा प्लॅन देखील फसला असता, तर त्यांनी प्लॅन सी म्हणजेच तिसरी योजनाही तयार ठेवली होती, असे पोलीस फाईल्सवरून समोर आले आहे.

( नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: सियाचे आई-वडील पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, केतनबाबत झाले हळवे तर लेकीबद्दल म्हणाले... )

सियाच्या चेहऱ्यावर दुःखच नव्हते

सुरुवातीला हा प्रकार केवळ एक अपघात वाटत होता. जोरदार वाऱ्यामुळे फोटो काढताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला, अशी खोटी कथा सियाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना सांगितली होती. त्यानुसार अपघाती मृत्यूची नोंदही झाली होती. मात्र, आपल्या होणाऱ्या पतीचा मृत्यू होऊनही सियाच्या वागण्यात अजिबात दुःख दिसत नव्हते. तिच्या याच संशयास्पद हाभावांवरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास चक्र फिरवली. 

पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा सिया आणि तिचा प्रेमी चेतन यांच्यात गेल्या 7 महिन्यांत तब्बल 2004 वेळा फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले. हा संवाद जवळजवळ 238 तासांचा होता. त्यांचे हे प्रेमसंबंध नोव्हेंबर 2025 पासून सुरू होते, जेव्हा दोन्ही कुटुंबे लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. या भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आणि अखेर सियाने गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisement

सिया आणि चेतनमध्ये जुंपली

अटक झाल्यानंतर आता या दोघांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला होता, पण कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे सियाने नकार दिला. त्यानंतर त्यांनी केतनला रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला. 

आता चौकशीदरम्यान चेतन पोलिसांना सांगतोय की, त्याला फक्त सियाला घेऊन पळून जायचे होते आणि हत्येचा विचार पूर्णपणे सियाचाच होता. तर दुसरीकडे सियाने चेतनवर आरोप केला आहे की, हत्येची मूळ कल्पना चेतनचीच होती आणि 14 जूनचा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर चेतन तिच्यासमोर ढसाढसा रडला होता. आता या दोघांचे हे दावे किती खरे आणि किती खोटे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article