Jitendra Dudi On LPG Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपी (OTP) प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त ओटीपी प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदाम,गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना तेल कंपन्या व वितरकांना देण्यात आल्या.त्यानुसार सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीच्या माध्यमातून 96 तासांच्या आत घरपोच करण्यात येईल,असा आशय दर्शविणारे फलक लावावेत,असे निर्देशही देण्यात आले.जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीद्वारेच 96 तासांच्या आत घरपोच करण्यात येईल,तरी गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये,असा संदेश (SMS) पाठवावा,असेही आवाहन करण्यात आले.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील फिश मार्केटमध्ये झालाय मोठा बदल! 'हा' मासा विकला जातोय प्रति किलो 1900 रुपये, कारण..
"गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केला, तर.."
याशिवाय, ग्राहकांनी घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत घरपोच वितरण करणे बंधनकारक राहील,असेही निर्देश गॅस वितरकांना देण्यात आले आहेत.नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल,असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> Mumbai News: मुंबईतील लाडक्या बहिणींचा व्यवसाय डबघाईला, CSMT जवळचं 'कुटुंबसखी' हॉटेल बंद पडणार? कारण काय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world