Pune News: बुधवार पेठेत आनंद लुटला, पैसे द्यायच्यावेळी घोळ झाला; 3 महिलांनी धू धू धुतलं; गुन्हा दाखल

Pune Crime News : मारहाणीच्या या घटनेनंतर पीडित व्यक्तीने फारसखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यातून मारहाणीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन पेमेंट करता न आल्यामुळे एका 39 वर्षीय व्यक्तीला तीन महिलांनी धू धू धुतल्याचा आरोप केला आहे. 12 सप्टेंबरच्या रात्री बुधवार पेठेतील लालबत्ती परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी फारसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती तमन्ना शाहरुख मुलाना (32) या महिलेला भेटायला गेला होता. आपलं काम झाल्यानंतर तक्रारदार तिथून निघाला. त्यावेळी ऑनलाइन पेमेंट करताना नेमका तो ॲपचा पासवर्डच विसरला. यामुळे त्याला पेमेंटही करता येईना.

(नक्की वाचा - Murder Mystery: घरामध्येच सुरू होते अंत्यसंस्कार, पोलीस पोहोचले अन् फिल्मी स्टाईल हायव्होल्टेज ड्रामा)

त्याच्याजवळ रोख पैसे देखील नव्हते. तसेच फोन करून कुणाकडून पैसे मागावं असं कारण देखील नव्हतं. मात्र सगळा प्रकार पाहून तमन्नाने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच आणखी दोन महिला, तनुजा हाकिम अली मौल्ला (34) आणि सोनिया गुलाम शेख (32), तिथे आल्या आणि तिघींनी मिळून त्या व्यक्तीला मारहाण केली.

(नक्की वाचा - CIDCO News: घरांच्या किंमत कमी करण्याबाबत सिडको सकारात्मक, 22 हजार घरांची लॉटरी ही लवकरच)

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मारहाणीच्या या घटनेनंतर पीडित व्यक्तीने फारसखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article