Pune MNS rada : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीविरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केदार सोमण असं पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. केदार सोमणच्या पोस्टनंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्या घराबाहेर जात राडा घातला.
केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागात राहतो. राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावरून सोमणने ही पोस्ट शेअर केली होती. फेसबूक पोस्ट समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना सोमणचं घर गाठलं. मनसे कार्यकर्त्यांनी घरात दरवाजा ठोठावला मात्र केदार सोमणने दरवाजा उघडलाच नाही. मनसे सैनिकांनी सोमण याला शिवीगाळ करत बाहेर येण्यास सांगितले. मात्र सोमण बाहेर आला नाही. अखरे मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पुणे पोलिसांना केदार सोमण याला ताब्यात घेतला आहे.
"आम्ही त्याला फटके द्यायला इथे ओला होतो. मात्र आता पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी आले आहेत. केदार सोमणने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्याविरोधात ही पोस्ट लिहिली आहे. याचा अर्थ कुणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, हो दोन नावे घेणे म्हणजे कुठल्यातरी पक्षाच्या नेत्याने त्याला यासाठी तयार केले आहे. पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं आहे, मात्र मनसे कार्यकर्ते त्याला सोडणार नाहीत", असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मनसे कार्यकर्ते केदार सोमणच्या ज्या फेसबुक पोस्टवरुन आक्रमक झाले ती पोस्ट देखील त्याने अद्याप डिलिट केलेली नाही. केदार सोमणने हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन मागील काही दिवसात बऱ्याच पोस्ट फेसबूकवर टाकल्या होत्या. विशेष म्हणजे मनसे कार्यकर्तो घराबाहेर राडा घालत असताना देखील केदास सोमण फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
मनसेच्या राड्यादरम्यान सोमणचे फेसबुक पोस्ट
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल लिहिलेल्या पोस्टमध्ये सोमणने म्हटलं की, "स्लिपमध्ये, विराट आणि रोहितची उणीव जाणवते आहे. मी बेट लावायला तयार आहे, विराट जर कॅप्टन असता तर, पहिली टेस्ट आपण हरलोच नसतो. असो..... पाठीला डोळे लावून किती काळ राहणार! आता आहेत त्यातच आनंद मानायचा."