Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होण्याचा मुहूर्त ठरला, मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश

मात्र आता पहिला टप्पा का होईना सुरू होईल आणि पुणेकरांची प्रतिक्षा संपेल असे सांगितले जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

मेट्रोचा हिंजवडी ते शिवाजीनगर हा पहिल्या टप्पा सुरू होण्याला मुहूर्त सापडला आहे. या मेट्रोच्या टप्प्यात 12 स्थानकं आहेत. हा टप्पा येत्या 30 जूनपर्यंत सुरू करा, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिली आहे. हा टप्पा आधीच सुरू होणार होता. पण अपूर्ण कामामुळे तो सुरू होवू शकला नाही. पुणेकरांना या मेट्रोची प्रतिक्षा होता. आता त्याला मुहूर्त मिळाला असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.  

ही मेट्रो सुरू झाल्यास येत्या महिन्याभरात  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या 12 स्थानकांपर्यंत प्रवास करता येणार आहे.  शिवाजीनगर पर्यंत पूर्ण प्रवास करण्यासाठी आणखी काही महिने पुणेकरांना वाट पाहावी लागणार आहे. हा पहिला टप्पा सुरू झाल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मॉल्स आहे. शिवाय आयटी हब ही आहे. त्यामुळे इथं काम करणाऱ्यांना हा मोठा दिलासा असेल. 

Advertisement

नक्की वाचा - Ambenali Ghat: आंबेनळी घाटात पुन्हा नको ते घडलं, या वेळी जे झालं त्याने परिसरात भीती अन् अंगाचा थरकाप

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरील देशातील ही पहिली मेट्रो आहे. ही मार्गिका हिंजवडी ते शिवाजीनगर अशी असणार आहे. याची लांबी जवळपास 23.2 किलो मिटर असेल. हा उन्नत मार्ग आहे. या प्रकल्पात टाटा समूहाची 'टीआरआयएल' आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांची भागीदारी आहे. यासाठी जवळपास 8 हजार कोटी रूपये खर्च आला आहे.  हा मार्ग तात्काळ सुरू करा अशा सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

नक्की वाचा - Pune News: स्मृतीभ्रंश झालेल्या आजोबांचा स्कुटीवरून 72 किमीचा प्रवास, घाबरलेल्या लेकीनं बापासाठी जे केलं...

दरम्यान या मार्गावर काही कामे अपूर्ण आहे. त्यामुळे 15 जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके सुरू करणार आहोत असं पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केलं. आहे. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांत शिवाजीनगरपर्यंतची 23 स्थानके सुरू करणार असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या मेट्रोची अनेक वर्षांपासून वाट पाहीली जात आहे. मात्र आता पहिला टप्पा का होईना सुरू होईल आणि पुणेकरांची प्रतिक्षा संपेल असे सांगितले जात आहे.