- आंबेनळी घाट महाबळेश्वर आणि पोलादपूर यांना जोडणारा अत्यंत धोकादायक आणि घनदाट जंगलातून जाणारा घाट आहे
- नुकत्याच एका युवकाने स्वतःच्या आजीचा खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकल्याची घटना समोर आली आहे
- अलिबाग पोलिसांनी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह शोधून काढण्याची विशेष मोहीम राबवली आहे
राहुल तपासे
आनंबनळी घाट हा दिवसेंदिवस घातक होत चालल्याचं दिसत आहे. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणार हा घाट अतिशय अवघड आणि घनदाट जंगलातून जातो. या घाटातून गाडी चालवणे म्हणजे एक प्रकारचे मोठे आव्हानच आहे. त्यात अलिकडच्या काळात झालेले अपघात पाहाताच अंगाचा थरकाप उडतो. नुकतीच इथं एक स्कॉर्पिओ कार खोल दरीत कोसळली होती. त्यात आठ जिवलग मित्रांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक नको ती घटना या घाटा घडली आहे. त्यामुळे इथल्या परिसरात भीती सोबत चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आंबेनळी घाट पुन्हा एकदा हादरला आहे. अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्याच आजीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकला. त्याची धक्कादायक कबुली खूनी नातवानेच दिली आहे. चौकशीदरम्यान संशयिताने पोलिसांना मृतदेह फेकल्याचे ठिकाण दाखवले. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने विशेष शोधमोहीम राबवली. धोकादायक दरीत उतरून पथकाने वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला. ही घटनासमोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय अंबनळी घाटात हे काय सुरू आहे अशीच चर्चा इथल्या स्थानिकांमध्ये होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण ही पसरले आहे.
या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास ही करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी आठ जिवलग मित्रांच्या गाडीचा अपघात ही याच आंबनळी घाटात झाला होता. त्यांची स्कॉर्पिओ कार खोल दरीत कोसळली होती. त्यात या आठही मित्रांचा मृत्यू झाला होता. दापोलीला हे सर्व मित्र फिरण्यासाठी गेले होते. हे सर्व जण सातारा जिल्ह्यातील होता. ट्रिप संपवून ते परतत होते. परतत जात असताना त्यांनी आंबेनळी घाटाने जाण्याचा निर्णय घेतला. कारण कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा हाच रस्ता आहे. वळणाचा आणि तेवढाच तोकडा हा घाट रस्ता घातक आहे. इथंच त्यांचा अपघात झाला आणि आठ ही जणांचा मृत्यू झाला.
काही वर्षापूर्वी म्हणजेच 2018 मध्येच या घाटात एक भीषण अपघात झाला होता. त्याचा ही संबंध दोपोलीसोबत होता. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला जात होती. त्यावेळी त्यांनी सहलीसाठी मिनीबस केली होती. मिनी बस हाऊस फुल होती. ज्यावेळी ही बस आंबनळी घाटातील अवघड वळणावर गेली त्याच वेळी ती दरीत कोसळली. या अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला होता. केवळ एक कर्मचारी या अपघातातून चमत्कारी पद्धतीने वाचला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world