Pune News: बोगद्याला मोठं छिद्र! पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता 'रूट मार्कर' बसणार, नागरिकांनाही..

रेंजहिल्स (शिवाजीनगर) ते स्वारगेटदरम्यान भुयारी मेट्रो मार्ग गेला आहे. याची माहिती नागरिकांना व्हावी,या उद्देशाने पुणे मेट्रो त्या मार्गावरील जमिनीवर येत्या 15 दिवसांत 'रूट मार्कर'बसवणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Underground Metro latest Update
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Underground Metro Update :  रेंजहिल्स (शिवाजीनगर) ते स्वारगेटदरम्यान भुयारी मेट्रो मार्ग गेला आहे. याची माहिती नागरिकांना व्हावी,या उद्देशाने पुणे मेट्रो त्या मार्गावरील जमिनीवर येत्या 15 दिवसांत 'रूट मार्कर'बसवणार आहे.त्यावर बोअरवेल खोदण्यासाठी 'मेट्रो'चे 'ना-हरकत प्रमाणपत्र'नागरिकांना घ्यावे लागणार आहे. स्वारगेट-रेंजहिल्स दरम्यानच्या भुयारी मार्गावर बोअरवेल खोदण्यासाठीचे काम सुरू असताना मेट्रोच्या बोगद्याला मोठे छिद्र पडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. त्याची दखल घेत पुणे मेट्रोने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. असे प्रकार पुन्हा घडू नयेत,यासाठी मेट्रो प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. जवळपास 80 ते 100 फूट खाली हा बोगदा आहे.

पुणे मेट्रोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर थांबवेकर यांनी म्हटलंय की,'झालेला प्रकार गंभीर आहे.त्यामुळे काटेकोर उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडेही संपर्क साधला जाणार आहे.बोअरवेलसाठी परवानगी देताना भुयारी मेट्रो मार्ग लक्षात घेऊनच कार्यवाही करण्याची त्यांना विनंती करण्यात येणार आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणचा हा रोड बनलाय हॉटस्पॉट, अल्पवयीनने प्रसिद्ध उद्योगपतीला उडवलं, अपघाताचा थरारक CCTV Video

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेली माहिती खालीलप्रमाणे

'या' उपाययोजना करणार

1. सर्व गृहरचना सोसायट्या, घरांमध्ये मेट्रो पत्र पाठविणार

2. जमिनीवर शक्य त्या ठिकाणी'रूट मार्कर' उभारणार

3. सुरक्षिततेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करणार

4. कूपनलिका खोदण्यासाठी मेट्रोचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार

5. महापालिका, भूजल सर्वेक्षण विभाग आदी शासकीय विभागांनाही सहभागी करून घेणार

भुयारी मेट्रोबाबत

रेंजहिल्स (शिवाजीनगर)- स्वारगेट : जवळपास 5 किलोमीटर

स्थानके : शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय, कसबा पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट

भुयारी मेट्रोसाठी झालेला खर्च : जवळपास तीन हजार कोटी रुपये