जाहिरात

Kalyan News: कल्याणचा हा रोड बनलाय हॉटस्पॉट, अल्पवयीनने प्रसिद्ध उद्योगपतीला उडवलं, अपघाताचा थरारक CCTV Video

अल्पवयीन मुलाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीला त्याने धडक दिली. या धडकेत कल्याण मधील प्रसिद्ध व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Kalyan News: कल्याणचा हा रोड बनलाय हॉटस्पॉट, अल्पवयीनने प्रसिद्ध उद्योगपतीला उडवलं, अपघाताचा थरारक CCTV Video
Kalyan Car Accident CCTV Video
मुंबई:

Kalyan Car Accident Video :  कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने घरातून कारची चावी घेतली अन् तो रिंग रूट रस्त्याने निघाला होता. परंतु, त्याच दरम्यान अल्पवयीन मुलाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीला त्याने धडक दिली. या धडकेत कल्याण मधील प्रसिद्ध व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी कार जप्त केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामिनी योगेश पांडे असं या आरोपी महिलेचं नाव आहे.

कल्याणमधील चांदोरी जवळून जाणार रिंग रोड हा आता भरधाव कारचालकांमुळे अपघाताचा हॉटस्पॉट ठरलाय. या रिंग रोडवर सुरू असलेले मुजोर वाहन चालकाचे स्टंट आता रिंग रूटवर किंवा मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतू लागलं आहे. मंगळवारी रात्री श्रीनिवास तांदळे हे व्यावसायिक रिंग रूटवर सायकलिंग करत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली.  या धडकेत श्रीनिवास तांदळे यांचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा >> "ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींचं होतंय आर्थिक नुकसान..", मंत्री आदिती तटकरे असं का म्हणाल्या? कारणे वाचा

अल्पवयीन मुलांकडून अपघाताचे सत्र सुरुच

या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. धक्कादायक म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता.रात्री खडकपाडा पोलिसांनी कार जप्त केली होती.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलांकडून अपघाताचे सत्र सुरुच आहे.परंतु, काही पालक यासंदर्भात गांभीर्य दाखवत नाहीत.त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो.याप्रकरणात मुलांच्या वडिलांविरोधातही कारवाई केली जाईल,असं पोलिसांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ashok Kharat: अशोक खरात HIV पॉझिटिव्ह? त्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ, "हजार बायका पोरं संकटात.."

याबाबत कल्याण मधील नामांकित सायकलींग ग्रुपचे सदस्य डॉक्टर रहेनुमा आयते शामुद्दिन यांनी म्हटलंय की, ज्या रस्त्यावर अपघात झाला आहे,त्या 
रस्त्यावर बॅरिगेटिंग करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपासून त्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिगेट्स हटवण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. याचा फटका मॉर्निंग वॉक,जॉगिंग ,सायकलिंग करणाऱ्यांना बसत आहे. गुरुवारी या संदर्भात सायकलिंग ग्रुप आणि कल्याण मधील नामांकित व्यक्ती आंदोलन करणार आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com