जाहिरात

Pune News :पुणेकरांची प्रतीक्षा संपणार! मे 2026 मध्ये 'या' मार्गावरून धावणार मेट्रो; पाहा काय आहे नवीन अपडेट

Pune Metro 3 Update : पुणेकरांसाठी आणि विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

Pune News :पुणेकरांची प्रतीक्षा संपणार! मे 2026 मध्ये 'या' मार्गावरून धावणार मेट्रो; पाहा काय आहे नवीन अपडेट
Pune Metro Update: पहिल्या टप्प्यात या मार्गावरील एकूण 12 स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. 
पुणे:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune Metro 3 Update : पुणेकरांसाठी आणि विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा लागून राहिली होती, त्या प्रवासाचा मार्ग आता मोकळा होताना दिसत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 प्रकल्पाने आता वेग घेतला असून, लवकरच शहरातील वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे.

महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकतीच या संपूर्ण 23.2 किलोमीटर मार्गिकेची प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ कागदी अहवालावर विसंबून न राहता, त्यांनी जमिनीवर उतरून कामाचा दर्जा आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामाचा वेग वाढवताना सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका, असे कडक निर्देश कंत्राटदार कंपन्यांना दिले आहेत.

मे 2026 पर्यंत मेट्रो धावणार

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आता मे 2026 हे नवे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या मार्गावरील एकूण 12 स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. 

यापूर्वी या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला विलंब झाल्यामुळे ही मुदत मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता मे महिन्यात ही सेवा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
 

देशातील पहिलाच पीपीपी प्रकल्प

पुणे मेट्रो लाईन 3 हा प्रकल्प अनेक अर्थांनी खास आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्त्वावर राबवला जाणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प ठरला आहे. या संपूर्ण 23.203 किलोमीटर लांबीच्या उन्नत (Elevated) मार्गासाठी सुमारे 8313 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 8 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते.

कोणते मेट्रो स्थानकं?

या मार्गावर एकूण 23 स्थानके असणार आहेत, जी शहरातील अत्यंत गजबजलेली ठिकाणे जोडणार आहेत. प्रवासाची सुरुवात मेगापॉलिस सर्कल येथून होईल. त्यानंतर एम्बेसी क्वाड्रोन बिजनेस पार्क, डोहलेर, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी आणि वाकड चौक या आयटी हबमधील स्थानकांचा समावेश आहे.

पुढे हा मार्ग बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर आणि शेवटचे स्टेशन सिव्हिल कोर्ट असा असेल. ही मेट्रो सुरू झाल्यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com