Pune News: पुणे म्हाडाच्या 4186 सदनिकांबाबत मोठा निर्णय, सोडतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा म्हणजेच म्हाडातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4,186  सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तोपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

4186 सदनिकांसाठी आतापर्यंत 1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1,33,885 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. 1 डिसेंबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. 

नक्की वाचा - Pune News: वृद्ध आई वडिलांना सांभाळण्यास लेकाचा नकार, कोर्टानं सुनावली अशी शिक्षा की परत कधी...

काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आल्याने व अनेक नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करणेसाठी तसेच इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्या विषयी मागणी करण्यात आली. नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शेवटची संधी म्हणून  30 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इतर मजकुर पुर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

नक्की वाचा - Pune News: पुणे रेल्वे स्टेशन की मृत्यूचा सापळा? 10 महिन्यात किती जीव गेले माहित आहे का?

पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 1683 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 299 सदनिका, 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील 864 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3222 सदनिकांचा समावेश आहे.

Advertisement