रेवती हिंगवे
पुणे सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. इथं होत असलेलं गँगवॉर असो की इथल्या गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ असो. पुणे हे तसं विद्येच माहेरघर म्हटलं जातं. पण याला धक्का लागणाऱ्या अनेक घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत. त्यात आता एका नव्या आकडेवारीने पुणेकरांची झोप उडणार आहे. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकात होणारे अपघात. आणि या अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या. ही संख्या पुणेकरांची नक्कीच डोकेदुखी वाढवणारी आहे. गेल्या दहा महिन्याची रेल्वे अपघातात मृत्यांची आकडेवारी पाहीली तर पुणे रेल्वे स्टेशन आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही.
पुणे रेल्वे स्टेशन हा जणून मृत्यूचा सापळा झाल्याची स्थिती आहे. पुणे रेल्वे स्थानकात गेल्या 10 महिन्यांत तब्बल 297 जणांचा जीव गेला आहे. हे अपघात रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहे. शॉर्टकटने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी अनेक जण पुणे रेल्वे स्थानकात रूळ ओलांडतात. हे रूळ ओलांडतानाच हे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. त्यात एक दोन नाही तर 297 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारे धक्कादायक म्हणावी लागेल. पुणे रेल्वे स्थानक हे तसं गजबजलेलं असतं.
अशा वेळी रेल्वे स्थानकांवर आरपीएफकडून सुरक्षा वाढविण्याची आता नागरिकांची मागणी आहे. लोकांनीही अधिक सतर्क आणि जबाबदारीने वागलं पाहीजे. नियमांचे पालन केले पाहीजे. तसं केलं नाही तर ते त्यांच्या जीवावरही बेतू शकतं हे या आकडेवारीवरून स्पष्ट होताना दिसत आहे. अनेक वेळी प्रवासी बेजबाबदारपणे रेल्वे रुळ ओलांडतात, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे हे दिसून येत आहे.
त्यात पुणे स्थानकात झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्यांची मागील पाच वर्षाची आकडेवारी ही बोलकी आहे. 2025 मध्ये आक्टोबरपर्यंत 297 जणांचा मृत्यू पुणे रेल्वे स्थानकात झाला आहे. तर 2024 मध्ये 385 जणांनी आपला जीव गमावला आहे. 2023 मध्ये 297, 2022 मध्ये 318 तर 2021 मध्ये 239 जणांचा मृत्यु झाला आहे. गेल्या वर्षी सर्वाधीक लोकांनी आपला जीव ठिकाणी गमावला आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला ही यापुढे कडक पाऊले उचलावी लागणार आहे. प्रवाशांनाही आपली जबाबदारी समजायला हवी. नाही तर असे अपघात वाढतच जातील अशी भिती व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world