
Pune MHADA Lottery deposit amount News: पुण्यात म्हाडाने घर घेणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ही घरं पुण्यात मोक्याची ठिकाणी आहेत. बरं येवढचं नाही तर मोक्याच्या ठिकाणी असूनही ही घरं स्वस्त आणि सर्वांना परवडणारी आहेत. या घरांच्या किंमतीही सर्व सामान्यांच्या आवाक्यातील आहे.अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाली आहे. त्यामुळे या घराच्या किंमती किती असणार आहेत. शिवाय अर्ज भरताना किती पैसे भरावे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
म्हाडाने पुण्याच घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या बंपर लॉटरीमध्यून 6168 घरे देण्यात येणार आहेत. त्यापैकी 1982 घरे ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नुसार देण्यात येणार आहेत. या लॉटरीच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पण या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी किती रुपये भरावे लागणार आहेत? कोणत्या गटासाठी अनामत रक्कम किती आहे? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक अर्जासोबत अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही अनामत रक्कम उत्पन्न गटानुसार वेगवेगळी आहे.
अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम
- अल्प उत्पन्न गट
- अनामत रक्कम -10,000 रुपये
- अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108
- एकूण - 10,708 रुपये
अत्यल्प उत्पन्न गट
- अनामत रक्कम - 20,000 रुपये
- अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108
- एकूण - 20,708 रुपये
मध्यम उत्पन्न गट
- अनामत रक्कम - 30,000 रुपये
- अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108
- एकूण - 30,708 रुपये
उच्च उत्पन्न गट
- अनामत रक्कम - 40,000 रुपये
- अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + GST 18 % रुपये 108
- एकूण - 40,708 रुपये
सर्वात स्वस्त आणि मस्त घर
पुणे म्हाडाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घर हे 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत देण्यात येणार आहे. PMRDA हद्दीत हे घर असेल. या योजनेचा संकेत क्रमांक 813-ए/बी आहे. योजनेचे नाव रोहन आनद फेज 1- 1 आरके / 1 बीएचके - सोमाटणे EWS / LIG असे आहे. या सदनिकेची अंदाजे किंमत 9,95,900 ते 12,03,900 रुपये असेल. सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ (चौ. मी.) 34.61 ते 41.87 इतके आहे. सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मी.) 23.60 ते 29.02 आहे. एकूण सदनिका 64 आहेत. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सर्वात स्वस्त घराची किंमत ही 7 लाखांपेक्षा कमी आहे. या योजनेचा संकेत क्रमांक 867-बी आहे. योजनेचे नाव चाकण - ता. खेड, जि. पुणे सर्व्हे नं. 818 PMAY - 1 आरके 1 असे आहे. या सदनिकेची अंदाजे किंमत 695,000 रुपये आहे. सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ (चौ. मी.) 27.74 इतके आहे. सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मी.) 23.74 आहे. एकूण सदनिका या 3 असतील.
अर्जदारास सोडतोपूर्वी अनामत रक्कम भरल्यानंतर, अर्ज कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही. अर्जदाराने Credit Card द्वारे अनामत रक्कम भरल्यावर ही रक्कम कोणत्याही कारणाने म्हाडाच्या खात्यामध्ये पोहचली नाही किंवा पोहोचण्यापूर्वी कोणत्याही कारणास्तव अर्जदाराच्या खात्यात परत वर्ग झाली तर अशा अर्जदारांचा अर्ज सोडतीकरीता ग्राह्य धरला जाणार नाही. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करा. ऑनलाईन अर्ज कसा भरावा?, अर्ज भरण्याची पद्धत, घरांच्या किमती या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी म्हाडा लॉटरी 2025 या लिंकवर क्लिक करुन अधिकृत जाहिरातीची पीडीएफ (Pune MHADA Lottery 2025 notification pdf) फाईल पहावी, त्यात सर्व माहिती मिळेल. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 11 सप्टेंबर 2025 पासून सुरूवात झाली आहे. तर शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world