Mumbai-Pune : देशातील सर्वात उंच केबल ब्रिजवर प्रवासासाठी प्रतीक्षाच, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ अंदाजे 20 ते 25 मिनिटांनी वाचणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक' प्रकल्पातील बोगद्याचे (टनेल) काम पूर्ण झाले आहे. मात्र वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करण्यासाठी अजून किमान पाच महिने वाट बघावी लागणार आहे, कारण टायगर व्हॅली भागातील केबल-स्टे ब्रिजचे (दोऱ्यांनी समर्थित पूल) काम अद्याप सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिसिंग लिंक प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र या प्रकल्पाना अपेक्षेपेक्षा जास्त महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रशासनाने या विलंबासाठी जोरदार पाऊस आणि तीव्र वारे ही कारणं सांगितली आहेत. ‘मिसिंग लिंक' प्रकल्पात एकूण 13 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे, जो आता बांधून पूर्ण झाला आहे. मात्र या बोगद्याला जोडणारा आणि टायगर व्हॅलीवर बांधला जाणारा पूल अद्यापही अपूर्ण आहे.  या पुलाचा सूपर-स्ट्रक्चर (म्हणजे प्राथमिक बांधकाम) पूर्ण झाले असले तरी, केबल्स बसवण्याचे काम प्रलंबित आहे.

नक्की वाचा - Pune Traffic Changes: बकरी ईदनिमित्त पुण्यातील मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल, बंद आणि पर्यायी मार्ग तपासा

हा पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर उभारला जात आहे. हवामानातील अडथळ्यांमुळे – विशेषतः खोर्‍यातील जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे कामगारांना कामामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवाशांची वेळ वाचेल...
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ अंदाजे 20 ते 25 मिनिटांनी वाचणार आहे. देशातील सर्वाच उंच केबल ब्रिज हे या प्रकल्पाचं मुख्य आकर्षण आहे. या मार्गावरील केबल स्टेड पुलामुळे खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचा प्रवास सहा किलोमीटरहून कमी होईल. सध्या खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत १९ किलोमीटर अंतर आहे. मात्र नव्या मिसिंग लिंकमध्ये हे अंतर १३.३ किलोमीटरपर्यंत पोहोचले. 

Advertisement