जाहिरात

Pune Traffic Changes: बकरी ईदनिमित्त पुण्यातील मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल, बंद आणि पर्यायी मार्ग तपासा

Pune Traffic changes : ईदनिम्मित सगळेच मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्रित येऊन नमाज पठण करतात. त्यामुळे याठिकाणी वाहतूक सुरळीत रहावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.  

Pune Traffic Changes: बकरी ईदनिमित्त पुण्यातील मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल, बंद आणि पर्यायी मार्ग तपासा

रेवती हिंगवे, पुणे

Pune Traffic : बकरी ईदनिमित्त पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. ईदनिम्मित सगळेच मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्रित येऊन नमाज पठण करतात. त्यामुळे याठिकाणी वाहतूक सुरळीत रहावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.  7 जूनला सकाळी 6 वाजल्यापासून ते नमाज पठण होईपर्यंत पुण्यातील मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, सेवन लव्ह चौक ते सीडीओ चौक आणि पुन्हा गोळीबार मैदानापर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुठल्या रस्त्यांवर बदल करण्यात आले आहे? 

बंद मार्ग: भैरोंबाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक सकाळी 6 वाजेपासून वळवण्यात येणार.

पर्यायी मार्ग : स्वारगेटकडे जाण्यासाठी - प्रिंस ऑफ व्हेल्स रोड - लुल्लानगर चौक मार्गे. 
पुणे रेल्वे स्टेशन कडे जाण्यासाठी - इम्प्रेस गार्डन रोडने इच्छित स्थळी. 

बंद मार्ग: मम्मादेवी चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारा मार्ग बंद. 

पर्यायी मार्ग: मम्मादेवी चौक - बिशप स्कूल किंवा कमांड हॉस्पिटल पासून इच्छित स्थळी. 

(नक्की वाचा- Fact Check : 6 जून रोजी केंद्र सरकारनं सुट्टी घोषित केली आहे का? वाचा Viral चर्चेचं काय आहे सत्य?)

बंद मार्ग: सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक नमाज पठण दरम्यान पूर्ण वेळ बंद. 

पर्यायी मार्ग: लुल्लानगरकडून येणारी वाहतूक सीडीओ चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी किंवा खटाव बंगला चौकापासून उजवीकडे वाळून इच्छित स्थळी. 

बंद मार्ग: सेवेन लव चौक ते गोळीबार मैदान.

पर्यायी मार्ग: सॅलिसबरी पार्क - सीडीओ चौक - भैरोबाला पासून इच्छित स्थळी.

बंद मार्ग: जुनी सोलापूर रस्ता चौकी चौक ते गोळीबार मैदान.

पर्यायी मार्ग: खाणे मारुती चौक पासून येणारी वाहतूक - पूलगेट डेपो - सोलापूर बाजार चौक - खटाव बंगला पासून इच्छित स्थळी .

(नक्की वाचा- Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता होणार 10 लेनचा सुपरहायवे? MSRDC चा प्रस्ताव काय?)

बंद मार्ग: लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणाऱ्या सगळ्या जड वाहनास, माल वाहतूक गाड्या, पीएमपीएमएल बस आणि इतर वाहनांना पूर्णपणे बंदी .

पर्यायी मार्ग: लुल्लानगर चौकातून - भैरोबाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com