गणेशोत्सवाची तयारी सर्वांनीच सुरू केली आहे. या वर्षी गणपतीचे आगमन हे लवकर होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर ही त्याची तयारी सुरू झाली आहे. वेगवेगळ्या शहरात गणेश मंडळांबरोबर प्रशासनांनी बैठका घेण्याची सुरूवात केली आहे. शिवाय नियोजन कसे असेल, काय केले पाहीजे यावर चर्चा गेली गेली आहे. त्यातून पुढील रुपरेषा आखली जात आहे. पुण्यात ही अशाच पद्धतीची एक बैठक पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी आयोजित केली होती. मात्र ही बैठक गणेशोत्सवातील नियोजना पेक्षा आयुक्तांनी दिलेल्या सल्लामुळे गाजली. त्याचीच चर्चा सगळीकडे होती.
पुण्यात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्या प्रमाणे मुंबईतल्या गणेशोत्सवाचे सर्वांना आकर्षण असते त्या प्रमाणेच पुण्यातील गणेशोत्सवाबाबतही असते. पुण्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. त्यांच्याकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे याकाळात पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाची रेलचेल असते. अशा वेळी शहराचं नियोजन महत्वाच ठरत. त्या दृष्टीने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुण्यातील गणेश मंडळांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला.
पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात झालेल्या बैठवकीत आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या एका अजब सल्ल्यामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करताना त्यांनी “दारूबंदी पेक्षा आपण दारू कमी प्यावी, हे अधिक महत्वाचे आहे,” असा सल्ला दिला आहे. त्यांच्या या अजब सल्ल्याने मंडळाचे कार्यकर्ते आवाक झाले आहेत. त्यांनी असा सल्ला का दिला याचाच विचार ते बैठक संपे पर्यंत करत होते.
Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड
दारू पिणे टाळा असा सल्ला दिला असता तर एक वेळ पटला असता. सणासुदीला असा सल्ला दिल्याने त्याचीच चर्चा सर्वत्र दिसली. आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली होती. मात्र आयुक्तांचा हा सल्ला अपेक्षित नव्हता. शिवाय ते असं का बोलले याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गणेशोत्सवातील शिस्त, ध्वनी प्रदूषण टाळणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा घेऊन आलेल्या पदाधिकाऱ्यांना ‘दारू कमी प्या' हा सल्ला मिळाल्याने उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली. पण ते असं का बोलले हे मात्र गुलदस्त्यात राहीलं.