Pune News: पुणेकरांनी घरातून बाहेर पडताना ही चूक अजिबात करू नका, महापालिकेनं 1408 नागरिकांवर केली मोठी कारवाई

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेनं 13 महिन्यांच्या अभियानांतर्गत  5186 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
PMC Latest News Update
पुणे:

Pune Municipal Corporation latest News : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेनं 13 महिन्यांच्या अभियानांतर्गत  5186 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलं आहे. महापालिकेनं 1408 लोकांवर कारवाई करून 7.24 लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. शहर प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेनं हे कठोर पाऊल उचललं आहे. पुण्यात पर्यावरणाचं नुकसान करणारे 50 मायक्रोनपेक्षा कमी वजनाचे प्लास्टिक आणि थर्माकोलवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.

या आदेशानुसार, पुणे महानगरपालिका (पीएमसी) ने जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत 13 महिन्यांचं विशेष अभियान चालवलं आहे. या कालावधीत पालिकेनं 1408 लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एकूण 5,168 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे आणि दोषींकडून 7 लाख 24 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या तुलनेत ही कारवाई तितकी प्रभावी नसल्याचं बोललं जात आहे. 

प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे माजी आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयात 'प्लास्टिक कचरा संग्रह प्रतियोगितेची'सुरुवात केली गेली होती.या दरम्यान नागरिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. कमी वेळातच 3248 किलो प्लास्टिक बॉटल्स एकत्र केल्या होत्या. 

नक्की वाचा >> Pune News: पुणे जिल्ह्याला मिळाली नवसंजीवनी, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं सर्वत्र होतंय कौतुक, कारण..

विजेत्यांना आकर्षक बक्षिसे

प्रतियोगितेच्या विजेत्यांना इलेक्ट्रिक बाईक आणि स्मार्टफोन सारखी बक्षिसं देण्यात आली. प्रशासनाचं म्हणणं आहे की, दंडात्मक कारवाईसोबत त्यांना प्रोत्साहन दिल्याने नागरिकांमध्ये जागरुकता वाढते आणि स्वच्छता अभियानाला मजबुती मिळते. 

Advertisement

प्लास्टिक मुक्त शहरा करण्याचा उद्देश

महापालिकेचा उद्देश दंडात्मक कारवाई आणि प्रोत्साहन यांचं संतुलन राखून पुणे प्लास्टिक मुक्त शहर बनवायचं. प्रशासनाने नागरिकांना अपिल केली आहे की,प्रतिबंधित प्लास्टिकचा उपयोग करू नये आणि पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करावं.