Pune Sahyadri Hospital : सह्याद्री हॉस्पिटलची जागा ना विकता येणार ना भाड्याने देता येणार, 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत

Pune Sahyadri Hospital: पुण्यातील मोठी रुग्णालय साखळी असलेलं सह्याद्री हॉस्पिटल्सची विक्री हा सध्या राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Pune Sahyadri Hospital : सह्याद्री हॉस्पिटलच्या विक्रीचा करार अडचणीत आला आहे.
पुणे:

रेवती हिंगवे, राहुल कुलकर्णी प्रतिनिधी

Pune Sahyadri Hospital: पुण्यातील मोठी रुग्णालय साखळी असलेलं सह्याद्री हॉस्पिटल्सची विक्री हा सध्या राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय आहे. भारतातील आघाडीची रुग्णालय साखळी असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्सने ही खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार 6,400 कोटी रुपयांना झाल्याची माहिती आहे. 

देशातील वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या व्यवहारांपैकी एक असलेला हा व्यवहार आता अडचणीत सापडलाय. पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट म्हणजेच सह्याद्री हॉस्पिटलला याबाबत नोटीस पाठवली आहे.  

Advertisement

सह्याद्री हॉस्पिटलने  मणिपाल हॉस्पिटलसोबत जो करारनामा केलाय त्याबाबतचे सर्व पत्र आणि जागेबाबतची काही पत्र असल्यास आणि महापालिका आयुक्तांची परवानगीची प्रत हे देण्यास बंधनकारक  आहे. त्यासोबतच 56 लाख 35 हजार 200 रुपयांचे प्रीमियम पुढील 7 दिवसांमध्ये देणे बंधनकारक असल्याचं या नोटीशीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्या जागेसंदर्भात काही व्यवहार असतील तर ते महापालिका आयुक्तांच्या परवानगी शिवाय होऊ शकणार नाहीत, असंही या नोटीशीमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

Advertisement

( नक्की वाचा : Sahyadri Hospital Pune: सगळे आरोप निराधार! गरजूंना यापुढेही निशुल्क उपचार मिळणार )
 

काय आहे नोटीस?

पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन कार्यालयाने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला एक पत्र पाठवले आहे. या पत्राचा विषय पुणे पेठ, एरंडवणे येथील फायनल प्लॉट नंबर 30 (Final Plot No. 30) येथील जागेच्या भाडेपट्ट्याबाबत आहे. हा प्लॉट नंबर 30, जो 1976 चौरस मीटर (1976 sq. mt.) क्षेत्राचा आहे, तो कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला 99 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आला आहे. यासाठी ट्रस्टने 53,35,200 रुपये (INR 5,335,200) प्रीमियम आणि प्रति वर्ग मीटर (per sq. mt.) 1 रुपया (INR 1) असे भाडे भरणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यात 27 फेब्रुवारी 1998 रोजी एक भाडेकरार (lease agreement) रजिस्टर करण्यात आला होता आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक आहे.

Advertisement

या करारानुसार, भाडेपट्ट्याने दिलेली जागा किंवा तिचा कोणताही भाग तसेच या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा कोणताही भाग इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला भाड्याने, पोटभाड्याने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे देता येणार नाही. मात्र, हॉस्पिटल योग्य रीतीने चालवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य संस्था किंवा कंपनीसोबत करारनामा करण्यास सवलत राहील असे नमूद आहे. तसेच, ही जागा इतर कोणालाही गहाण, दान , बक्षीस, इजमेंट किंवा इतर कोणत्याही जडजोखमीत गुंतवता येणार नाही. जर हॉस्पिटलच्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन राष्ट्रीयीकृत बँक , सहकारी बँककिंवा अन्य कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण ठेवावयाची असेल, तर त्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

( नक्की वाचा : Sahyadri Hospital Pune: मराठी माणसे जाऊन राज्याबाहेरची माणसे कशी आली? सह्याद्री हॉस्पिटलबाबतचे गूढ आणखी वाढले )
 

सध्याच्या परिस्थितीत विविध वर्तमानपत्रांमध्ये सह्याद्री हॉस्पिटलने (Sahyadri Hospital) परस्पर मदर रुग्णालय मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपला (Manipal Hospitals Group) हस्तांतरित केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या संदर्भात, कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने सह्याद्री हॉस्पिटलसोबत (Sahyadri Hospital) केलेला सामंजस्य करार 30 सप्टेंबर 2006 रोजी झाल्याचे दिसून येते.

पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) आणि मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपसोबत (Manipal Hospitals Group) केलेल्या कराराची प्रत, तसेच जागा कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण किंवा तारण ठेवली असल्यास त्यासंबंधीचे दस्तऐवज आणि त्यासाठी महापालिका आयुक्तांची (Municipal Commissioner) परवानगी घेतली असल्यास तिची छायांकित प्रत, तसेच पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात संपूर्ण प्रीमियम रक्कम भरल्याच्या पावत्यांची प्रत पुढील 7 दिवसांत सादर करण्याची विनंती केली आहे. वसुंधरा बारवे (Vansudhara Barve), उपायुक्त, मालमत्ता व व्यवस्थापन, पुणे महानगरपालिका यांनी हे पत्र 16 जुलै 2025 रोजी पाठवले आहे.

( नक्की वाचा : Pune News: मराठी माणसाने उभ्या केलेल्या 'सह्याद्री' हॉस्पिटल साखळीची विक्री, 6,400 कोटींना झाला सौदा )
 

NDTV मराठीचा इम्पॅक्ट

NDTV मराठीने सह्याद्री रुग्णालयाच्या जागेच्या संदर्भात एक रुपयाला दिलेल्या जमिनीचा गैरवापर, मणिपाल ग्रुपसोबतच्या व्यवहाराचे संभाव्य उल्लंघन आणि मूळ करारातील अटींच्या पायमल्लीवर प्रकाश टाकला होता.

या वृत्तानंतर महापालिकेने तातडीने दखल घेत, ट्रस्टला थेट इशारा दिला आहे. करारातील अटी क्र. 7 आणि 8 चा भंग झाल्याचे स्पष्ट करत, सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश ट्रस्टला देण्यात आले आहेत. अन्यथा कारवाईचे संकेत PMC ने दिले आहेत.
 

Topics mentioned in this article