Pune News : पुण्यात 28 वर्षीय डॉक्टर तरुणाची आत्महत्या, गूढ चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य

श्याम वोरा हे गुजरातमधील भावनगरचे रहिवासी होते. ते 2023 पासून रूबी हॉल क्लिनिकच्या रेडिओलॉजी विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यात  २८ वर्षीय डॉक्टरने रूबी हॉल क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरने एक गूढ चिठ्ठी लिहून मागे ठेवली आहे. श्याम पंकज वोरा मृत डॉक्टरचे नाव आहे. 

श्याम वोरा हे गुजरातमधील भावनगरचे रहिवासी होते. ते 2023 पासून रूबी हॉल क्लिनिकच्या रेडि(नक्की वाचा-  नागपुरात मान्सूनपूर्व कामांची लगबग, शहराच्या काही भागांत 116 वस्त्यांमध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार)ओलॉजी विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावरील मानसिक तणाव आणि दबाव इतका वाढला होता की त्यांनी सोमवारी पहाटे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणात कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
 

(नक्की वाचा-  Ajit Pawar: 'तडजोड होणार नाही..', वर्धापनदिनी अजित पवारांचे मोठे विधान, मनोमिलनावर काय म्हणाले?)

डॉ. वोरा यांनी कामाच्या दबावामुळे आत्महत्या केली असा दावा त्याच्या घरांच्या केला आहे. आमचा त्या दिशेनं तपास सुरु असून अजून कोणतेही पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात वोरा यांच्या विभागप्रमुखांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे आणि आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे मेसेज तपासले तर ते सामान्य मेसेज असल्याचं आढळलं, असंही पोलिसांनी सांगितलं. 

Advertisement


फक्त एका मेसेजमध्ये डॉ. वोरा यांनी मला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असा दावा केला. त्यामुळे तो कोणत्या तरी टेन्शनमध्ये असावा असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असं पोलिसांनी सांगितलं. 

Topics mentioned in this article