Pune News: पुण्यात मोक्याच्या ठिकाणी 4186 घरं, म्हाडाच्या सोडतीची तारीख झाली जाहीर

काही तांत्रिक अडचणी व निवडणूक आचारसंहिता या कारणांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४१८६ सदनिकांची संगणकीय सोडत
  • मंगळवार दहा फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत
  • २,५८,८३२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २,१५,९६५ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील 4186 सदनिकांची विक्री होणार आहे.  त्यासाठी मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ही सोडत दुपारी 12.00 वाजता काढण्यात येईल. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ही संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. पुणे म्हाडा मार्फत ही घोषणा करण्यात आली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात या सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 4186 सदनिकांसाठी एकूण 2,58,832 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 2,15,965 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलेला आहे. त्यांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुणे मंडळाच्या या सोडतीला अर्जदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

नक्की वाचा - Ajit pawar News: अजित पवार जिवंत, विमानात बॉम्ब ते 50 कोटींचा विमा! शिंदेंच्या शिलेदाराचे मोठे वक्तव्य

 पुणे मंडळातर्फे सोडतीसाठी 11 सप्टेंबर 2025 रोजी 4186 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पुणे, पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3322 सदनिकांचा आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 सदनिकांचा सोडतीत समावेश करण्यात आला आहे. अर्जदारांच्या विनंतीनुसार, काही तांत्रिक अडचणी व निवडणूक आचारसंहिता या कारणांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.

नक्की वाचा - Satara News: सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणखी एक वाघ, ‘हिरकणी'च्या एन्ट्रीचा दमदार Video

या सोडतीच्या निमित्ताने सर्व अर्जदारांना आवाहन करण्यात येते की , अर्जदारांनी मंगळवार 10  फेब्रुवारी 2026 रोजी सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.  ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य नाही त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त संदेशामध्ये मिळालेल्या YouTube URL https://youtube.com/live/QTmRzDT_NbA?feature=share वरुन सोडतीचा कार्यक्रम ऑनलाईन थेट घरबसल्या बघता येणार आहे. त्यामुळे जे या सोडतीला प्रत्यक्ष येवू शकणार नाहीत त्यांना ऑनलाईन सोडत पाहाता येणार आहे. 

Topics mentioned in this article