GBS Patient Death: पुणेकरांची चिंता वाढली; आणखी एका GBS रुग्णाचा मृत्यू

guillain barre syndrome : मृत तरुण मूळचा सोलापूरचा होता पण डीएसके धायरी विश्वमध्ये राहायला होता. काही दिवसांपूर्वीच त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

ररेवती हिंगवे, पुणे

पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. अशात पुण्यात आणखी एका GBS रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शनिवार एका जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुण्यातील DSK विश्वमध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आह. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मृत तरुण मूळचा सोलापूरचा होता पण डीएसके धायरी विश्वमध्ये राहायला होता. काही दिवसांपूर्वीच त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले होते. मात्र पुन्हा श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला सोलापूरच्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Advertisement

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )

सध्याची रुग्णसंख्या

शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, 14 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण 73 रुग्णांपैकी 44 रुग्ण ग्रामीण पुण्यातून, 11 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातून, तर 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून आहेत. तसेच सर्वाधिक 14 रुग्ण हे किरकीट वाडी येथील आहेत. 

(नक्की वाचा-  Pune Metro News: पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! प्रजासत्ताक दिननिमित्त मेट्रोची खास ऑफर; फक्त 20 रुपयात...)

त्यानंतर DSK विश्व येथे आठ,  नांदेड सिटी येथे सात, आणि  खडकवासला येथे सहा रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, 73 रुग्णांपैकी 48 पुरुष, 24 महिला असून, तीन रुग्ण पाच वर्षांखालील आहेत. पुण्यात अचानक वाढलेल्या GBS प्रकरणांवर राष्ट्रीय पातळीवरील सेंटर सर्व्हिलन्स युनिटने लक्ष दिले आहे. त्यांनी राज्य आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे.

Topics mentioned in this article