Pune News : पुण्यातील 777 पुलांचे ऑडिट; 5 पूल अत्यंत धोकादायक, 3 पुलांवर जड वाहतूक पूर्णपणे बंद

Pune News : पुणे जिल्ह्यातील 227 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सध्या चालू असून त्याचे ही ऑडिट येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल.  पुणे जिल्ह्यात 21 ब्रिटिश कालीन पूल देखील आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा इथला पूल कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्यभरातील धोकादायक पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा समोर आला. पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने पुण्यातील या घटनेनंतर 777 पुलांचे ऑडिट केले.  

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या पाहणीत ५ पूल हे अत्यंत धोकादायक ठरले. त्यापैकी ३ पुलांवर जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर 2 पुलांवर डागडुजीच काम चालू असून ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. 

132 मोठे आणि 645 असे छोटे मोठे पुले असे एकूण 777 पूल पुणे जिल्ह्यात असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार सगळ्या पुलांचे ऑडिट हे करण्यात आले. पुणे जिल्ह्यात एकूण 777 पूल असून त्यातील 136 पुलांना लवकरात लवकर डागडुजीची गरज तर 39 पुलांचे ऑडिट हे पूर्ण झाले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील 227 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सध्या चालू असून त्याचे ही ऑडिट येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल.  पुणे जिल्ह्यात 21 ब्रिटिश कालीन पूल देखील आहेत त्यांना देखील अंडर मॉनिटर ठेवले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. कुंडमळा येथे झालेल्या अपघातानंतर पुणे जिल्ह्यातील पुलांच ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते.

Advertisement
Topics mentioned in this article