यशपाल सोनकांबळे
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर वाढले आहे. या दरात वाढ झाल्यामुळे रिक्षाच्या भाड्यात ही वाढ केली जावी अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात रिक्षाची भाडेवाढ होणार आहे. ही भाडेवाढ ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार आहे. पुण्यात रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानंतर लवकरच नवे दर लागू होण्याची शक्यता. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला पुन्हा एकदा चाट लागणार आहे. रिक्षा संघटनांनी या भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला जात आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी मान्य केला आहे. त्यानंतर एक प्रस्ताव तयार केला आहे. जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांची त्याला मंजुरी आवश्यक आहे. त्यांच्या मंजुरीनंतर ऑगस्ट महिन्यात नवे दर लागू होणार आहेत. सध्याचे भाडे पहिल्या दीड किलोमीटरला 25 रुपये आहे. त्यानंतर प्रति किलोमीटरला 17 रुपये मोजावे लागतात. आता यातच वाढ केली जाणार आहे. या भाडेवाढीला प्रशासन ही सकारात्मक आहे. त्यामुळे पुणेकरांना या भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
आता प्रस्तावित भाडे पहिल्या दीड किलोमीटरला 30 रुपये होणार आहे. म्हणजेच 5 रूपयांना हे भाडे वाढणार आहे. त्यानंतर प्रति किलोमीटरला 20 रुपये मोजावे लागणार आहे.म्हणजे यातमध्ये ही प्रति किलोमिटर मागे 3 रूपये वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या जवळपास मंजूरी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. सीएनजी आणि इंधनदर वाढीमुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचा रिक्षा संघटनांचा दावा होता. त्याचा हा दावा मान्य ही करण्यात आला आहे. त्यानुसार एक ऑगस्ट पासून पुण्यात हे नवे दर लागू होणार आहेत.
भाडेवाढीमुळे नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि दैनंदिन प्रवाशांच्या प्रवासखर्चात वाढ होणार आहे. पुण्यात जवळपास 1 लाख 30 लाख रिक्षा आहेत. त्यातून दररोज सुमारे 20 लाख प्रवासी रिक्षाने प्रवास करतात. ही संख्या पाहाता रिक्षातून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. अशात या भाववाढीचा फटका आपोआप या लोकांना बसणार आहे. त्यामुळे या भाववाढीनंतर पुणेकर काय करतात हे पाहवं लागणार आहे.