Pune News: रुपाली ठोंबरे-पाटील यांच्याविरोधात गु्न्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Pune News: रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीवर एका महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याच संदर्भात त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा आणि माजी राज्य प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यात जाऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी रुपाली पाटील-ठोंबरे खडक पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याशी गैरवर्तन करत अरेरावी केल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर (FIR) नोंदवला आहे.

(नक्की वाचा-  Amravati News : 'कुणाची हत्या करणं इस्लाममध्ये वैध आहे का?', भाजप खासदाराच्या प्रश्नावर काय आलं उत्तर?)

प्रकरण काय होते?

रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीवर एका महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याच संदर्भात त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. तिथे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याशी वाद घालत गैरवर्तन करणे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, रुपाली पाटील-ठोंबरे यांचा पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतच्या वादावरून सध्या पक्षामध्येही तणाव आहे. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात चाकणकर यांच्यावर टीका केल्याबद्दल पक्षाने त्यांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article