जाहिरात

Pune News: पुणेकरांचे बजेट कोलमडणार! CNGच्या दरात आजपासून वाढ, पाहा नव्या किंमती, दरवाढीचं काय आहे कारण?

Pune News: पुण्यात 3 एप्रिलपासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर काय आहेत? वाचा सविस्तर बातमी.

Pune News: पुणेकरांचे बजेट कोलमडणार! CNGच्या दरात आजपासून वाढ, पाहा नव्या किंमती, दरवाढीचं काय आहे कारण?
"Pune CNG New Rate: पुण्यातील सीएनजीचे दर काय?"
NDTV Marathi

- अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune News: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडींचा थेट फटका आता पुणेकरांच्या खिशाला बसू लागला आहे. आधीच पेट्रोल आणि घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली असून हे नवे दर 3 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

पुण्यात कुठे-कुठे झालीय सीएनजी दरवाढ?

प्रामुख्याने Torrent आणि MNGL या दोन कंपन्या सीएनजीचा पुरवठा करतात. एमजीएल कंपनी शहरी भागात तर टोरेंट कंपनी  ग्रामीण भागात पुरवठा करते. एमएनजीएलच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून टोरेंट कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ केलीय. ग्रामीण भागात दोन रुपयांनी सीएनजी महागला.

पुण्यातील सीएनजीचे काय आहेत नवे दर?

या दरवाढीपूर्वी पुण्यामध्ये सीएनजीचा दर 92.50 रुपये प्रति किलो इतका होता. पण ताज्या दरवाढीनंतर आता पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 94.50 रुपये मोजावे लागणार आहेत. अचानक झालेल्या या वाढीमुळे रिक्षाचालक, टॅक्सी चालक आणि सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहन मालकांसह सर्वसामान्यांचंही बजेट कोलमडणार आहे.

दरवाढीचे मुख्य कारण

माहितीनुसार या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे प्रामुख्याने कारणीभूत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाल्याने नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाली असून त्याचे पडसाद स्थानिक बाजारपेठेत उमटताना दिसत आहेत.

(नक्की वाचा: LPG Vs PNG: मुंबईकरांनो सावधान! 3 महिन्यात LGP कनेक्शन कापणार? सायन, लोअर परळसारख्या भागातील धक्कादायक वास्तव)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

सर्वसामान्यांच्या खिशावर भार

गेल्या काही काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्या तरी एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. आता पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएनजीच्या किमतीही 95 रुपयांच्या जवळ पोहोचल्याने मध्यमवर्गीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आगामी काळात जागतिक परिस्थिती सुधारली नाही, तर इंधन दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com