जाहिरात

Pune Rain: पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, झाड कोसळल्यानं एका कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Pune Rain : पुणे शहरात आद ( बुधवार, 2 एप्रिल 2026) निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारी हजेरी लावणाऱ्या पावसाने बुधवारी पुणेकरांना मोठा धक्का दिला.

Pune Rain: पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, झाड कोसळल्यानं एका कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Pune Rain : मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांत झाडे कोसळली.
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Rain : पुणे शहरात आद ( बुधवार, 2 एप्रिल 2026) निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारी हजेरी लावणाऱ्या पावसाने बुधवारी पुणेकरांना मोठा धक्का दिला. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील सर्वात मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना नवश्या मारुती परिसरात घडली असून, एका झाडाखाली दबल्या गेल्याने ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाजवळ असलेल्या नवश्या मारुती परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला होता. याच वेळी येथील एका लहान टपरीवर अचानक एक मोठे झाड कोसळले. 

या टपरीमध्ये असलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Pune Rain: पुण्यात एप्रिलमध्येच पावसाळा! मुसळधार पावसाने पुणेकरांची उडवली दैना, वाहने पाण्यात तरंगली )
 

रस्त्यांवर साचले गुडघाभर पाणी

पुणे शहर आणि उपनगरात केवळ तासाभराच्या पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे. बाणेर रस्ता, बालाजीनगर आणि विश्रांतवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला असून सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. 

रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत पावसासोबतच मोठी गारपीट झाल्याचेही पाहायला मिळाले.

पावसासोबत असलेल्या वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, शहरातील अनेक भागांत जुनी आणि मोठी झाडे कोलमडून पडली आहेत. दांडेकर पुलाजवळ एक मोठे पिंपळाचे झाड पडल्याने स्वारगेटहून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच याच परिसरात सहवास हॉलजवळ कडुलिंबाचे झाड पडल्याने रस्ता बंद झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान रस्ते मोकळे करण्याचे काम करत आहेत.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

पुण्यात गेल्या 4 दिवसांपासून अशाच प्रकारचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळपासून कडक ऊन आणि दुपारनंतर अचानक वादळी पावसाचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोसाट्याचा वारा असताना जुन्या इमारती किंवा मोठ्या झाडांच्या खाली उभे राहणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com