जाहिरात

Nasarapur Pune: नसरापूर प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? वाचा संपूर्ण टाईमलाइन एका क्लिकवर

आपण ही घटना घडल्या पासून निकाल लागेपर्यंत काय काय घडलं यावर एक नजर टाकणार आहोत.

Nasarapur Pune: नसरापूर प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? वाचा संपूर्ण टाईमलाइन एका क्लिकवर
  • नसरापूर गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती
  • पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुरावे गोळा केले होते
  • पोलीसांनी पंधरापेक्षा कमी दिवसांत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून १२०० पानांचा आरोपपत्र न्यायालयात सादर केला
पुणे:

नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणात नराधम भीमराव कांबळे याला कोर्टाने दोषी ठरवले. त्यानंतर त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने सुनावलेल्या या शिक्षेचं संपूर्ण राज्यात स्वागत केलं जात आहे.  पण जोपर्यंत या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत खरा न्याय मिळाला नाही अशी भावना पिडीत चिमुरडीच्या पालकांची आहे. राजकीय वर्तूळात ही यानिकाला बाबत प्रतिक्रीया उमटल्या आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात फास्ट चाललेला खटला आहे. आपण ही घटना घडल्या पासून निकाल लागेपर्यंत काय काय घडलं यावर एक नजर टाकणार आहोत. 

नक्की वाचा - Pune Nasarapur Case: ब्रेकिंग! नसरापूरच्या नराधमाला फाशी; 2 महिन्यात न्याय मिळाला

 
नसरापूर प्रकरणात काय घडलं? 

  1. तारीख 1 मे 2026 पुणे जिल्ह्यात नसरापूर हे गाव आहे. यागावातून एक चिमुकली बेपत्ता झाली. तिचं वय अवघं साडेतीन वर्ष होतं. शोधाशोध केल्यानंतर चिमुकलीचा मृतदेह संध्याकाळी आढळून आला. प्राथमिक तपासात तिची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. 
  2. तारीख 2 मे 2026 पोलीस या प्रकरणाने हादरले. तातडीने त्यांनी सुत्र हलवली. पुणे ग्रामीण पोलीसांनी सीसीटीव्ही, खबरी, आणि तांत्रिक पुरावे गोळा केले. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर लैंगिक अत्याचार, खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
  3. तारीख मे 2026 पहिला आठवडा पिडीत चिमुकलीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाले. त्याच वेळी तपासात घटनास्थळावरील नमुने त्याचसोबत भौतिक इव्हिडंन्स पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच काळात नसरापूर परिसरात आंदोलनं झाली. पोलीसांवर प्रचंड दबाव होता. गुन्ह्याचा सीन रिक्रेएट करण्यात आला. आरोपी विरोधात याच काळाच ठोस पुरावे गोळा केले गेले. 
  4. तारीख 16 मे 2026  पोलीसांनी विक्रमी वेळेत म्हणजेच 15 दिवसांत या केसचा तपास पूर्ण केला. ऐवढेच नाही तर विशेष न्यायालयात 1 हजार 200 पानी आरोपपत्रही दाखल केले होते.   
  5. तारीख 28 मे 2026 न्यायालयाने ही आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले होते. त्यानंतर या खटल्याच्या सुनावणीला सुरूवात करण्याची परवानगी दिली होती. 
  6. तारीख जून 2026  सरकारी पक्षाने जे पुरावे होते ते कोर्टा समोर सादर केले शिवाय साक्षीदार ही न्यायालया समोर उभे केले. याच काळाच साक्षीदारीची साक्ष झाली. त्याच बरोबर समोरच्या पक्षाने त्यांची उलट तपासणी ही केली. ही संपूर्ण प्रक्रीया याच महिन्यात पूर्ण झाली. 
  7. तारीख 20 जून 2026 या तारखे पासून अंतिम युक्तीवाद सुरू झाला होता. सरकारी पक्षाने जोरदार युक्तीवाद करत फाशीच्या शिक्षेची मागणी कोर्टाकडे केली होती. 
  8. तारीख 25 जून 2026 आरोपी भीमराव कांबळे या कोर्टाने  दोषी ठरवलं. शिवाय शिक्षा सुनावण्याची पुढची तारीख दिली. 
  9. तारीख 29 जून 2026 कोर्टाने अखेर आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनवाली. एका महिन्यात कोर्टाचा निकाला लागला.  

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com