Pune News : सह्याद्रीच्या कुशीत सेलिब्रेशन; भयंकर घडलं अन् वाढदिवशीच निघाली अंत्ययात्रा!

आपला वाढदिवस स्मरणीय करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र पुण्यातील एका तरुणाची वाढदिवशीच अंत्ययात्रा निघाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : आपला वाढदिवस स्मरणीय करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण वाढदिवशी हटके असं प्लानिंग करतात. कोणी परदेश दौऱ्यावर जातं तर कोणी थेट किल्ला गाठतात. पुण्यातील एक तरुण किल्ल्यावर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला असता येथेच त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. केतन विशाल अग्रवाल असं त्याचं नाव आहे. तो अवघ्या २४ वर्षांचा होता.  

वाढदिवशीच घरातून निघाली अंत्ययात्रा...

केतन आपला २४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील लोहगडावर गेला होता आणि येथेच अघटित घडलं. ट्रेकिंगदरम्यान केतनचा मृत्यू झाला. घटनेनंतर बचाव पथक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत केतनला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. केतन अग्रवाल हा गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीचा रहिवासी होता. वाढदिवशीच केतनच्या घरातून त्याची अंत्ययात्रा निघाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण मुलगा गमावल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : भोंदू बाबाच्या संपर्कात आली अन् तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त; पुण्यातील अंगावर काटा आणणारी घटना

लोहगडावर केतनसोबत नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, केतन वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेला होता. सध्या पुण्यातील काही भागात पाऊस झाला आहे. त्यामुळे लोहगडावरील भाग ओलसर आणि निसरडा झाला आहे. यातच केतनचा पाय घसरून तो घरीत कोसळला. दरीत पडून केतनचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.