Pune News: पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे गणेश मंडळांमध्ये मतभेद? कारण काय?

विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचे पाच गणपती म्हणजे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, आणि केसरी वाडा गणपती.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे

संपूर्ण महाराष्ट्र आता वाट पाहत आहे ती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोमाने सुरू आहे. सगळ्या मंडळांचे देखावे आणि इतर तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. या वर्षी गणपती लवकर येत आहेत. कारण 27 ऑगस्टला गणपती बाप्पाच आगमन होणार आहे. त्यातच पुण्याच्या गणपती उत्सवाचे खास आकर्षण हे  मनाचे पाच गणपती असतात. पुण्याच्या परंपरेनुसार मनाचे पाच गणपती विराजमान झाल्याशिवाय आणि त्यांच विसर्जन झाल्याशिवाय कुठलाच सार्वजनिक गणपती हा बसत नाही, ना त्याचं विसर्जन होतं. मात्र याच वर्षी या कारणावरूनच पुण्यातील गणेश मंडळामध्ये मतभेद दिसून येत आहे. 

विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचे पाच गणपती म्हणजे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, आणि केसरी वाडा गणपती. या गणपतींचं विसर्जन झाल्यावर अन्य गणपतींचे विसर्जन होते. त्यात मग  त्वेष्टाकासार, पुणे महानगरपालिका, दगडूशेठ गणपती, भाऊसाहेब रंगारी, आणि मग बाकीची गणेश मंडळं विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. यावर्षी मात्र पुण्यात गणेश मंडळांमध्ये काही वादाचे मद्दे समोर आले आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Manoj Jarange Patil: जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली

बाकीच्या सार्वजनिक गणपती मंडळांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की ते मानाचे मग आम्ही कोण? त्या सोबतच त्यांचे म्हणणे असं आहे की गणपती विसर्जन मिरवणूक ही 32 तास हून अधिक चालते. मानाचे पाच गणपती आणि नंतर येणारे मोठे मंडळ गेल्या नंतर लोकांची संख्या कमी होते. मग आम्ही देखावे आणि इतर गोष्ट करायची कोणासाठी? आमच्यावर हा अन्याय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात अनेक बैठका देखील पुण्यात होत आहेत. टिळक रस्त्यावर खूप गर्दी होते. आधीचे मंडळ सगळी लक्ष्मी रस्त्यानी येतात. तेच पहिले अलका चौकात पोहोचतात. त्यांना प्राधान्य मिळते मग आम्हाला का नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Ramdas Kadam: 'गृहराज्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी पोलिसांनीच षडयंत्र रचले', कदमांचा मोठा आरोप

यावर काय तो तोडगा काढला पाहिजे असं देखील त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदन दिले आहे.   आज झालेल्या बैठकीत अनेक मंडळ होती. पूर्व भागातील मंडळांनी अशी मागणी केली की यावर बसून सविस्तर चर्चा करावी. त्यासोबतच सरकारने विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यांबाबत काही तरी तोडगा काढला पाहिजे. सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. त्यांनी असंही अवाहन ही केल आहे की लोकांना त्रास होणार नाही अश्या प्रकारचे स्पीकर वापरावे. आता यावर्षी सांस्कृतिक शहरातली अनेक वर्ष चालत आलेली परंपरा मोडते की यावर काही तोडगा निघेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement