Pune News: लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर चाकूने हल्ला, हल्ल्याचा थरार CCTV मध्ये कैद

लिफ्टमध्ये थुंकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपींनी पीडित महिलेच्या पतीवर चाकूने सपासप वार केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे 

काही गोष्टी अशा असतात की त्यामुळे वाद निर्माण होतात. तर काही वेळा हे वाद विकोपाला जातात. मग ते वाद घरातील असो की घरा बाहेरच. अशीच एक घटना सध्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चीली जात आहे. एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की थेट चाकू हल्ला करण्यापर्यंत तो टोकाला गेला. हा चाकू हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या घटनेमुळे सर्वच जण आवाक आणि हैराण झाले आहेत.  

पिंपरी येथील मोरवाडी भागात ही घटना घडली आहे.  लिफ्टमधील शू रॅकवर थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला. या वादातून एका जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. मात्र त्याचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी महिला हिच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्या आला आहे.  महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Dharashiv News: पाण्याची बाटली, सोबत खोबरेल तेल, मिश्रण प्या, भयंकर आजार पळवा! अंधश्रद्धेचा कळस

लिफ्टमध्ये थुंकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपींनी पीडित महिलेच्या पतीवर चाकूने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. थुंकल्यानंतर घराबाहेरच दोन कुटुंबात वाद झाला. त्यानंतर घरात असलेला अल्पवयीन मुलगा चाकू घेवून बाहेर आला. त्याने काही कळण्या आता समोर असलेल्या व्यक्तीवर चाकू हल्ला केला. आधी पाठीत नंतर शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी त्याने चाकूने वार केले. 

नक्की वाचा - 'आमच्या धर्माच्या आड येऊ नका...', जैन नेत्याने सुनावलं, संदीप देशपांडेंनीही खडसावलं, कॉल रेकॉर्डिंग VIRAL

त्यानंतर त्या मुलाला त्याची आई घरात घेवून गेली. मात्र हल्ला झालेलं कुटुंब ही त्या मुलावरनंतर तुटून पडले. त्यानंतर सोसायटीच्या आवारातच जोरदार राडा झाला. हा संपूर्ण राडा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर दुसरीकडे, आरोपीच्या पतीने फिर्यादी कुटुंबावरच छळाचा प्रतिआरोप केला आहे. फिर्यादी कुटुंब गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास देत असून, त्यांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलाला घरात घुसून मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोन्ही बाजूंच्या या आरोप-प्रत्यारोपांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहेत.