Pune News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात ऐतिहासिक निर्णय; 25 वर्षांची परंपरा कायमची बंद! 

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 :  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३५ वी जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान पुण्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३५ वी जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने देशभरात तयारी सुरू आहे. १४ एप्रिल रोजी राज्यभरात मोठी मिरवणूक काढली जाते. अनेक ठिकाणी डिजेच्या दणदणाटात ही मिरवणूक काढली जात असल्याचं पाहायला मिळत. दरम्यान पुण्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक निर्णय

पुणे शहरात यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 'नो डीजे' म्हणून साजरी केली जाणार आहे. पुण्यातील प्रमुख दलित संघटना, उत्सव समिती, कार्यकर्ते आणि तब्बल ४० विविध संघटना-मंडळांनी मिळून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भीमसेवा प्रतिष्ठान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली स्पीकरची डीजेची परंपरा यंदा कायमची बंद करण्याचा निर्ण य घेतला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना प्रोत्साहन देत, डीचेचा इतिहास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील नो डीजे हा निर्णय राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही दीपस्तंभ ठरणार आहे. हे पाऊल म्हणजे जयंती उत्सवाच्या नव्या पर्वाची नांदी मानली जात आहे.  लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (DJ Banned in Pune During Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

Advertisement


छत्रपती संभाजीनगरमध्येही पोलिसांकडून आवाहन...

पुणे, मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढली जाते. या वर्षापासून बाबासाहेबांची जयंती डीजे आणि लेझरमुक्त साजरी करण्यासाठी पोलिसांनी सर्व भीमबांधवांना आवाहन केलं आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुकीत नियमांचं उल्लंघन करून डीजे किंवा लेझरचा वापर केल्यास गुन्हे दाखळ केले जातील असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.