Pune News: 'सासऱ्याशी शरिर संबंध ठेव', पती अन् सासूचा सुनेवर दबाव, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात भयंकर कांड

लग्नाच्या पंधरा दिवसानंतर नवरा बायको हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा पती गौरवने आपल्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे

राज्याची संस्कृतीत राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे.  पण आता त्यावर मोठा प्रश्न चिन्हं उपस्थित झालं आहे.दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे पुणे स्मार्ट सिटी बनण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे टोळी युद्ध, महिला आत्याचार, कोयता गँग, गाड्यांची तोडफोड अश्या अनेक घटना वाढलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीचं शहर अशी नवी ओळख पुण्याला मिळत आहे. त्यात आणखी एक सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.  

या घटनेमुळे माणूस नेमका काय मानसिकतेत वावरतोय हे काही कळायला मार्ग नाही. एका महिलेवर तिच्याच सासऱ्याकडून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट घडली असून याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहे. शिक्षित माणसं असं करायला लागली तर याहून माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट कुठली? असं म्हणावं लागेल.  

नक्की वाचा - Pune News: आयुष कोमकरच्या हत्ये आधी काय घडलं? थरारक घटनाक्रम सांगताना आई ढसाढसा रडली

या धक्कादायक घटनेनं पुणे हादरून गेलं आहे. संबंधित प्रकरणात आरोपी पती गौरव जयसिंग तांबे (वय 35), सासू श्रद्धा जयसिंग तांबे (56 वय) आणि सासरे जयसिंग तांबे (वय 61) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत केलेल्या तक्रारीनुसार, सासरे हे पोलीस खात्यातील निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी ओळखीचा धाक दाखवून रात्री घरात घुसत फिर्यादीला जबरदस्ती पकडले. शिवाय शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली असा आरोप पीडितेने केला आहे.  या प्रकरणातील आरोपी पती गौरवचा आणि पीडित तरुणीचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.

नक्की वाचा - 4 महिन्या पूर्वी लग्न, सासरचा जाच, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल, लेकीसाठी आई-बापाचा हंबरडा

लग्नाच्या पंधरा दिवसानंतर नवरा बायको हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा पती गौरवने आपल्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. तर पीडितेने असा आरोप केला आहे की तिचा पती म्हणजेच गौरव तांबे हा नपुंसक असून तिच्या सासऱ्याने ह्यामुळेच हे कृत्य केले. त्यानंतर सासूने आणि पतीने वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली होती. मुल हवं म्हणून सासऱ्या बरोबर शरिर संबंध ठेव असा दबाव सूनेवर पती आणि सासूकडून टाकला जात होता. 10 सप्टेंबर रोजी सासरे जयसिंग तांबे यांनी फिर्यादीच्या घरी घुसून जबरदस्ती शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement