- मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भाषणात न घेतल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला
- नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या कार्यालयात भीमसैनिकांनी शाही फेक केली
- नाशिक, बारामती आणि अमरावती येथे प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचे स्मरण न केल्यामुळे भीमसैनिकांनी आक्रमक
देवा राखुंडे
मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भाषणात घेतले नाही म्हणून नाशिकमध्ये माधवी जाधव या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. मंत्र्यांनी मोठी चुक केली आहे असं ही त्या म्हणाल्या. शिवाय आपण माफी मागणार नाही. सस्पेंड केले तरी चालेल असं ही त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. प्रजासत्ताक दिनी हे सर्व घडलं. नाशिकमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर बारामतीत ही तसाच एक प्रकार समोर आला. त्यामुळे इथं भिमसैनिक आक्रमक झाले होते.
बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाही फेक करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नसल्यामुळे भीमसैनिक आक्रमक झाले होते. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर भीमसैनिकांनी शाही फेक केली आहे. प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणे गरजेचे होते. पण तसे नगराध्यक्ष कार्यलयात झाले नाही. त्यामुळे भीमसैनिकांनी आक्रमक झाले होते. त्यांनी थेट नगराध्यक्षांवर शाही फेक करत आपला निषेध नोंदवला.
यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी घोषणाबाजी देखील केली. प्रजासत्ताक दिनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला नसल्याने आज विविध संघटनानी एकत्रित आंदोलन केलं.सकाळी आंदोलन केल्यानंतर दुपारी सचिन सातव यांच्यावर ही शाई फेक करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्या आहेत. नाशिक, बारामती, अमरावती या ठिकाणी ही अशाच घटना समोर आल्या. प्रजासत्ताक दिना बाबासाहेबांचे स्मरण झालेच पाहीजे अशी भीमसैनिकांची भावना होता.
नाशिक आणि बारामतीत झालेल्या घटनांचे पडसाद राज्यभर उमटताना दिसले. मंत्री गिरीश महाजान यांनी तर दिलगिरी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेबांचे नाव अनावधानाने घ्यायचे राहीले असं स्पष्टी करण ही त्यांनी दिलं होतं.तर माधवी जाधव या अॅट्रोसिटी दाखल झाली पाहीजे यासाठी ठाम होत्या. शेवटी त्यांनी आपली तक्रार ही दाखल केली आहे. प्रजासत्ताक दिना याच घटनेची चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली. या संपूर्ण प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली आहे.दि. 26 जानेवारी 2026 रोजी बारामती नगरपालिकेत आयोजित अधिकृत प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभात राष्ट्रीय ध्वज संहिता, 2002 चे उल्लंघन,तसेच भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा जाणीवपूर्वक अवमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप युवा मोर्चाने केला आहे.
अधिकृत ध्वजारोहण समारंभस्थळी श्रद्धांजली अर्पणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो/प्रतिमा ठेवण्यात आलेली नव्हती, तर केवळ महात्मा गांधी यांचा फोटो प्रदर्शित करण्यात आला.याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता,“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवण्याबाबत कोणतीही राजपत्रातील (Gazette) अधिसूचना किंवा प्रोटोकॉल नाही”असे तोंडी उत्तर देण्यात आले असा आरोप भाजपा युवा मोर्चाच्या लेखी तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यास कोणताही लेखी आदेश, शासन निर्णय किंवा नियमाचा संदर्भ देण्यात आलेला नाही.याच समारंभात राष्ट्रीय ध्वजाची सलामी दोन वेळा देण्यात आली. एकदा ध्वजारोहणापूर्वी व दुसऱ्यांदा ध्वजारोहणानंतर ही बाब भारताचा ध्वज संहिता, 2002 च्या स्पष्ट तरतुदींना विरोधात आहे. नियमानुसार ध्वजारोहणानंतर, राष्ट्रीय गायनाच्या वेळी एकदाच सलामी देणे अपेक्षित असते.