सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. राज्यभरात गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबई पुण्यात तर गणेशोत्सवाचा माहोल आहे. येणाऱ्या काही महिन्यातही वेगवेगळे सण असणार आहेत. त्यामुळे कोणत्या सणाला कोणत्या दिवशी सुट्टी असेल यांची सर्वांनाच उत्सुकता असते. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांनी 2025 साठी कोणत्या सुट्ट्या आहेत, त्याची यादी जाहीर केली आहे. त्या दिवशी सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल असं आदेशात म्हटलं आहे.
विभागीय आयुक्त पुणे विभाग डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सन 2025 या वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी खालील दिवस स्थानिक सुट्ट्या म्हणून जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 14 मार्च 1983 रोजी शासन, सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश करण्यात आला आहे.
नक्की वाचा - मोठा पेच! मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी' संबोधण्यास हायकोर्ट- सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार
सन 2025 मधील स्थानिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे
- 1) सोमवार, दि. 01 सप्टेंबर 2025 – गौरीपूजन
- 2) सोमवार, दि. 22 सप्टेंबर 2025 – घटस्थापना
- 3) सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 – नरक चतुर्दशी
त्यामुळे येणाऱ्या एक तारखेला गौरीपूजनाची सुट्टी पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना असणार आहे. त्यानंतर येणाऱ्या नौरात्रात घटस्थापनेची ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय नौरात्रानंतर येणाऱ्या दिवाळी बाबतही या सुट्टीच्या यादीत उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार नरक चतुर्दशीलाही सुट्टी करण्यात आली आहे. म्हणजे या तीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत हे या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.