रेवती हिंगवे
पुण्यात कोथरूड परिसरामध्ये एक धक्कादायक घटन घडली. एका सामान्य नागरिकाला कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या टोळी मधल्या गुंडांनी किरकोळ कारणावरून गोळी घातली. त्यात तो जबर जखमी झाला. तेव्हाच थोड्या अंतरावर जाऊन अजून एका नागरिकाला दहशत पसरवण्यासाठी कोयत्याने मारले. ही घटना कोथरूड पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडली होती. त्या नंतर पोलिसांनी तब्बल 7 जणांना अटक केली होती. तर काहीच दिवसात पोलिसांनी त्या आरोपींची धिंड देखील त्याच परिसरात काढली. शिवाय निलेश घायवाळच्या घराची झाडाझडती पण केली गेली. त्यामध्ये दोन दुचाकी आणि एक चारचाकी जप्त करण्यात आली. हाच निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे. तो सध्या लंडनमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कुख्यात गुंड निलेश घायवाळचा थेट संबंध कोथरूड गोळीबारशी नाही. असं असलं तरी देखील त्यामध्ये मुख्य आरोपी असलेला मयूर कुंभरे, याचासह निलेश घायवाळवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये निलेश घायवाळने मयूर कुंभरेला शस्त्र पुरवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चौकशी करत असताना असं निष्पन्न झाल की निलेश घायवाळने परदेशात पलायन केले आहे. त्याचा मुलागा लंडनमध्ये असतो. तर प्रश्न असा उपस्थित होतो की एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना पण त्याला पासपोर्ट कसा मिळाला? त्याने बनावट पासपोर्ट तर तयार केला नाही ना यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहे.
त्याने बनावट कागद कुठून करून घेतली. असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याचे उत्तर कधी मिळतील याचा पण काही नेम नाही. कुख्यात गुंड निलेश घायवाळवर पुणे जिल्ह्यात एकूण 23 ते 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पण नेमक या कुख्यात गुंडाला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली कोणी? एम कॉम शिकलेला निलेश बन्सीलाल घायवाळ गुंडगिरीच्या मार्गावर आला कसा आणि त्याचावर वरदहस्त कोणाचा? कारण निलेश घायवाळ याचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत देखील फोटो वायरल झाला होता. तर खंडणी गोळा करून एवढी संपत्ती झाली की थेट लंडनला मुलाला शिकायला पाठवल. पण तिकडे घर ही घेतलं. हे सगळ्यात मोठ गौडबंगाल आहे.
निलेश घायवाळ हा कुख्यात गुंड आणि खंडणीखोर म्हणून ओळखला जातो. तो विशेष म्हणजे एम.कॉम शिकला आहे. त्याच्यावर खंडणी मागण्याचे गुन्हे आहेत. त्याने खंडणीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. त्या पैशाच्याच जीवावर त्याने स्वत:च्या मुलालाही शिकण्यासाठी लंडनला पाठवले. मुलगा लंडनला असल्यामुळे त्याने तो पैसै तिथे गुंतवल्याचीही चर्चा आहे. मुलगा आणि केलील गुंतवणूक यामुळे त्याला इंग्लंडचा व्हिसाही सहज मिळाल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याचे रेकॉर्ड पाहाता त्याला रोखता येणं शक्य होतं. पण तो पोलीसांच्या हातावर तुरी देवून सहज लंडनला पळाला आहे हेच सत्य आहे.