- पुरंदर तालुक्यातील पिंगोरी जंगलात अज्ञात व्यक्तीने वणवा लावल्याने जवळपास दीड हजार एकर वनसंपदा नष्ट झाली आहे
- वणव्या मुळे शेतकऱ्यांच्या चारा कडब्यांचे नुकसान झाले असून त्यांना मोठ्या आर्थिक तोट्याची भीती वाटत आहे
- पिंगोरी पोलिस पाटील आणि सरपंच यांच्या विनंतीनंतर वनविभागाने वणवा विझवण्याचे काम सुरू केले आहे
देवा राखुंडे
सध्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरीतील शेतकरी दहशतीत आहेत. त्याला कारण ही तसेच आहे. पिंगोरीच्या जंगलात जे काही घडलं त्याने इथला शेतकरी भितीच्या सावटाखाली आहे. त्याला कारण ही तसेच आहे. येथे जंगलाला अज्ञानत व्यक्तीने वणवा लावला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. जवळपास दीड हजार एकराहून अधिक डोंगरावरील वनसंपदा यात नष्ट झाली आहे. हे कुणी केले हे समजायला मार्ग नाही. त्यात मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचा कडब्याची गंज पेटून कडबा जळाला आहे. त्यामुळे पुढे ही कुणी असे केले तर काय करायचे अशा चिंतेत शेतकरी आहे.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे डोंगराला मोठा वणवा लागला होता. हा वणवा जवळपास दीड हजार एकरावर पसरला आहे. पिंगोरीचे पोलिस पाटील आणि सरपंच यांच्या विनंती नंतर वनविभागाने वाणवा विझवण्यास सुरूवात केली आहे. मात्र तो पर्यंत दीड हजार एकरावरील वनसंपदा नष्ट झाली आहे. हा संपूर्ण भाग जेऊरीच्या खंडोबा मंदिराला लागून आहे. तर या वणव्या दरम्यान एका शेतकऱ्याची कडब्याची गंज पेटल्याने त्याचा दीड दोन लाखाचा जाणवरांचा चारा जाळून नष्ट झाला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे.
वणवा लागणे आणि लावणे या गोष्टी होत असताता. मात्र त्यातून शेतकऱ्यांचे किंवा वन्य जिवांचे नुकसान होणार नाही याकडे आवर्जून लक्ष दिले जाते. पण इथं तसे झाले नाही. जवळपास दिड हजार एकरचा परिसर या वणव्याने व्यापला आहे. ऐवढ्या मोठ्या भागात वणवा पसरण्याची ही पहिलीच घटना असल्याचं इथले स्थानिक सांगत आहेत. अशा घटना टाळल्या पाहीजे असे गावकऱ्यांची मागणी आहे. अशा वणव्याचा फटाक वन्य जिवांनातर बसतोच पण त्याचा फटका शेतकऱ्यांना ही बसत आहे असं गावकरी म्हणाले. त्यामुळे जर कुणी असे वणवे लावत असेल तर त्यांना प्रतिबंध करा अशी मागणी होत आहे.
वणव्याची दाहकता पाहात इथल्या शेतकऱ्यांनी या घटनेचा धसका घेतला आहे. त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. काही लोक जंगलात जात असतात. त्यावेळी जर ते वणव्याच्या कचाट्यात सापडले असते तर केवढा मोठा अनर्थ घडला असता असं ही त्यांनी सांगितलं आहे. अनेक जनावरंही चरण्यासाठी या भागात जंगलात जातात. त्यांच्या ही जिवाला या अशा वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने या घटनेकडे गांभिर्याने पाहावे असं ही गावकऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या हा वणवा विझवण्याचं काम सुरू आहे. लवकरच त्यावर नियंत्रण मिळवले जाईल असं वन विभागाने स्पष्ट केलं आहे.